बॉलिवु़डचा भाईजान अभिनेता सलमान खान आज २७ डिसेंबरला ५६ वर्षांचा झाला. मात्र वाढदिवसाच्या एका दिवसा अगोदरच त्याला सापाने दंश केल्याने त्याच्या चाहत्यांमध्ये निराशा पसरली आहे. सध्या त्याचे चाहाते सलमान खानसाठी चिंतेत असुन त्याच्यासाठी प्रार्थना करत आहेत. सलमानला सापाने दंश केल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर तो ठिक असल्याची माहिती स्वता सलमाननेच दिली.

ANIने दिलेल्या माहितीनुसार, सापाबद्दल सलमानने सांगितले कि, माझ्या फार्महाऊसवर साप घुसला होता. त्याला मी लाकडाच्या मदतीने बाहेर काढायचा प्रयत्न केला पण तो हळुहळु माझ्या हाताजवळ पोहचला. त्यानंतर मी त्याला हाताने पकडायला गेलो तेव्हा त्याने मला तीन वेळा दंश केला. तो एक विशारी साप होता. साप चावल्यानंतर तो ६ तास हॉस्पिटलमध्ये भरती होता. आता तो ठिक आहे.

सलमानला रायगड जिल्ह्यातील पनवेल येथील त्याच्या फार्महाऊसवर एका विषारी सापाने चावले. ही घटना शनिवारी रात्री घडली. त्यानंतर त्याला नवी मुंबईतील कामोठे येथील हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. त्यानंतर रविवारी सकाळी त्याला सोडण्यात आले.

सलमानचा आज वाढदिवस आहे. सध्या त्याचा सर्व परिवार त्याच्या सोबत आहे. ते सगळे सलमानच्या वाढदिवसाची तयारी करत आहे. मात्र तो वाढदिवस कुठे साजरा करणार हे अद्याप समजलेले नाही.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *