जुगाड करण्याच्या बाबतीत आपला देश पहिल्या क्रमांकावर येईल असे म्हटल्यास हरकत नाही. आपल्याकडे प्रत्येकाला कमी साधनांमध्ये खुप काही बनवायच असते. विशेष म्हणजे याची कला भारतवासींयांकडे चांगलीच अवगत आहे. उदा. भंगारातले सामान आणि बाईकचे जुने इंजिन वापरुन जीप तयार करणारा एक मुलगा. सध्या सोशल मीडियावर एक मोडीफाय जीप खुप व्हायरल होत आहे.

या आगळ्यावेगळ्या जीपला बाईक सारखे किक मारुन स्टार्ट करता येते. त्या व्यक्तीने खुप जुगाड करुन ही जीप बनवली आहे. तो ती जीप घेऊन रस्त्यावरुन सुद्धा फिरत असतो. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर लोकांकडुन त्याच्या युक्तीचे कौतुक होत आहे. या कौतुक करणाऱ्यांमध्ये महिंद्रा ग्रुपचे मालक आनंद महिंद्रा सुद्धा सहभागी आहेत.
आनंद महिंद्रा सोशल मीडियावर नेहमी खुप अॅक्टीव्ह असतात. ते नेहमीच लोकांच्या आगळ्यावेगळ्या कलांचे कौतुक करत असतात. या वेळी त्यांनी या अनोखी जीप बनवणाऱ्याचे कौतुक केले.

त्यांनी त्यांच्या ऑफिशिअल ट्विटर अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करत लिहीले की, हे वाहन गाड्यांच्या कोणत्याच नियमांमध्ये बसत नाही. पण तरी मी आपल्या लोकांच्या सरळतेचे तसेच त्यांच्या कमी मधुन जास्त गोष्टी तयार करण्याच्या क्षमतेचे कौतुक करणे बंद करणार नाही.

महत्वाची गोष्ट म्हणजे या आगळ्या वेगळ्या जीपच्या बदली आनंद महिंद्रा यांनी त्या युवकाला एक नवी कोरी बोलेरो कार ऑफर केली आहे. त्यांनी ट्वीट मध्ये लिहीले की स्थानिक अधिकारी लवकरच त्याला हे वाहन चालवण्यापासुन रोखतील कारण ते सर्व वाहनांच्या नियमांचे उल्लंघन करते. मी या व्यक्तीला त्या जीपच्या बदल्यात बोलेरोची ऑफर देतो. शिवाय त्याची जीप आम्ही MahindraResearchValley मध्ये प्रर्शित करु.

या अनोख्या जीपचा व्हिडीओ Historicano या युट्युब चॅनलने अपलोड केला होता. ही जीप महाराष्ट्रात राहणाऱ्या दत्तात्रय लोहार यांनी बनवली आहे. ती बनवायला त्यांना ६० हजार रुपये खर्च आला. त्यांच्या मुलाची इच्छा पुर्ण करण्यासाठी त्यांनी ही जीप तयार केली.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *