या कारणामुळे सलमान खान आणि अमीर खान यांची दोस्ती तुटली आणि दुश्मनी झाली, जाणून घ्या !

82

अंदाज अपना अपना मध्ये सुपरस्टार सलमान खान आणि अमिर खान यांच्या जोडीने काम केले होते. त्यांची ही जोडी प्रेक्षकांना खुपच आवडली. शिवाय दोघांचा अंदाज ही खुप अनोखा आहेच. सलमान त्याच्या चित्रपटांमधुन प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतो तर अमीर त्याच्या प्रत्येक चित्रपटाच्या कहाण्यांनी प्रेक्षकांची मने जिंकुन घेतो. हे दोघेही सुपरस्टार बॉलिवुड इंडस्ट्रीची आवडती जोडी आहे. मात्र त्यांच्यात असे काही घडले ज्यामुळे त्यांच्यातील मैत्री संपुष्टात आली. तर चला मग जाणुन घेऊ असे काय घडले या दोघांमध्ये जे त्यांच्यात शीतयुद्ध सुरु झालं.

२०१४ मध्ये सलमानची लाडकी बहिण अर्पिताचा विवाह बलिवुड अभिनेता आयुष शर्मा सोबत झाला. त्यावेळी अमीर त्यांच्या परिवारातील सदस्याप्रमाणे सारे काम पाहत होता. मिळालेल्या माहितीनुसार त्याचवेळी सलमान आणि अमीर मध्ये काहीतरी घडले. त्यानंतर अमिरने त्याच्या घरी एक पार्टी ठेवली होती तेव्हा सुद्धा सलमान खान त्या पार्टीला आला होता.

तेव्हा सलमानच्या बजरंगी भाईजान चित्रपटाचे अमीर खानने कौतुक केले. आणि टोमना देखील मारला कि सलमानला अजुनही चित्रपट निवडता येत नाही. अमीर सलमानला म्हणाला कि अशा प्रकारची मॅच्युरिटी जर त्याने आधीच दाखवली असती. तर त्याच्या पदरात आणखी चांगले चित्रपट आले असते. शिवाय सलमानला सर्व सहज उपलब्ध असते. त्याला स्क्रिनप्ले साठी जास्त काही विचार करावा लागत नाही.

सलमानने आणि अमिर खान मध्ये शीतयुद्धा चे कारण हे त्यांचे चित्रपट आहे. सलमानला त्याच्या चित्रपटासाठी जास्त मेहनत करावी लागत नाही कारण अर्ध्याअधिक चित्रपट हे त्याच्या नावावरच चालतात. सलमानचे फॅन त्याच्या नावावरच त्याचे चित्रपट पाहण्यास थिएटरमध्ये गर्दी करत असतात असे अमीर खान म्हणाला होता. या सर्वाची सुरुवात सलमानचा सुलतान आणि अमीरच्या दंगल च्या रिलीज वरुन झाला होता असे म्हटले जाते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !