बॉलिवुड मध्ये असे अनेक कपल आहेत जे त्यांच्या रिलेशनशिप मुळे अनेकदा चर्चेत असतात. त्यातीलच एक कपल म्हणजे अर्जुन कपुर आणि मलायका अरोरा. नात्याच्या सुरुवातीला या दोघांकडुनही त्याबद्दल कोणते ही स्पष्टीकरण झाले नव्हते. मात्र मलायकाचा अरबाज सोबत घ*ट*स्फो*ट झाल्यावर मात्र मलायका आणि अर्जुन दोघांनीही सोशल मीडियावर खुलेआम एकमेकांसोबत फोटो टाकण्यास सुरुवात केली.

अर्जुन मलायकापेक्षा वयाने १२ वर्षे लहान असल्यामुळे यांचे नाते सतत ट्रोल होत असते. मात्र तरीही या दोघांनी अशा गोष्टींकडे दुर्लक्ष केले नाहीतर वेगवेगळ्या माध्यमांतुन त्या ट्रोलिंगला उत्तर दिले. आता पुन्हा एकदा अर्जुन ने मलायका पेक्षा लहान असल्यामुळे होणाऱ्या ट्रोलिंगला सडेतोड उत्तर दिले आहे.

अर्जुन आणि मलायकाचे नाव टिनसेल टाउन च्या आईटी’ कपल्समध्ये सहभागी आहे. सध्या अर्जुनचे वय ३६ असुन मलायका ४८ वर्षांची आहे. ही जोडी सतत वयात असलेल्या १२ वर्षांच्या अंतरामुळे ट्रोल होत असते. यावेळी मसाला डॉट कॉम शी बोलते वेळी अर्जुनने म्हटले की, मिडीया ट्रोलर्सच्या कमेंट या मीडियाच जास्त मनावर घेते आम्ही नाही. मी स्वता ट्रोलिंगला जास्त मनावर घेत नाही कारण त्या खोट्या असतात आणि खालीफुकट गदारोळ निर्माण करतात.

शिवाय जे लोक मला सोशल मीडियावर ट्रोल करतात त्यातलेच काही लोक मी प्रत्यक्षात दिसल्यावर माझ्यासोबत सेल्फी घेण्यासाठी उत्सुक असतात. त्यामुळे हा सर्व काही भ्रम आहे. ट्रोल कोण करते कोण नाही या सर्व गोष्टीचा आम्ही ९० टक्के भाग पण पाहत नाही त्यामुळे अशाप्रकारच्या ट्रोलिंगला आमच्याकडुन फारसे महत्व दिले जात नाही.

प्रेमात वय महत्वाचे नसते – अर्जुनने पुढे म्हटले, मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात जे काही करतो तो माझा विशेषाधिकार आहे. मी केलेल्या कामाची लोकांना जाण आहे तो पर्यंत ठिक आहे. बाकी सर्व सावळा गोंधळ. मलायका आणि त्याच्या वयातील अंतरावर होणाऱ्या ट्रोलिंगवर तो बोलला की, मला त्याचे काही महत्व वाटत नाही. आपल्याला फक्त जगता आला पाहिजे, जगायला दिल पाहिजे आणि पुढे जात आला पाहिजे. त्यामुळे मला वाटते कि वय पाहणे आणि कोणत्याही नात्याला एक प्रसंग बनवणे हे मुर्खपणाचे लक्षण आहे.

मलायका साठी अर्जुनची नव्या वर्षाची खास पोस्ट – मलायका आणि अर्जुनने त्यांच्या सोशल मीडिआ अकाउंटवरुन त्यांचा फोटो पोस्ट करत चाहत्यांना २०२२ या नवं वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *