लग्नकार्य म्हटलं की प्रत्येक सर्वसामान्य घरात पैसा हा एक मोठा प्रश्नचिन्ह बनुन उभा राहतो. त्यातल्या त्यात मुली कडची बाजु असेल तर जास्त रक्कम हाती असावी लागते. अशा वेळी पालक त्या मुलीच्या बालपणापासुनच तिच्या लग्नासाठी पैसे साठवायला सुरुवात करतात. आपल्या मुलीचे लग्न मोठ्या धुमधडाक्यात व्हावे. तिच्या लग्नात काही कमी पडु नये अशी प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते.

त्यासाठी ते वेगवेगळ्या स्किम मध्ये पैसे साठवत असतात. पण प्रत्येक स्किम ही सुरक्षित आणि फायदेशीर असे नाही. त्यामुळे पैसे गुंतवताना कधीही विचारपुर्वक करावे. पैसे गुंतवताना त्यावर ते कधी गुंतवावे ते कधी वाढवावे या सर्व गोष्टींचा विचार केला पाहिजे.

SIP मध्ये करा गुंतवणुक – पैसे गुंतवल्यावर तुम्हाला त्यातुन जास्त पैसे परत हवे असतील तर सिस्टमेटिक इंवेस्टमेंट प्लान (SIP) हा उत्तम पर्याय आहे. या मार्फत तुम्ही काही वर्षात चांगला रिटर्न मिळवु शकता. त्यासाठी तुम्ही दरमहा कमीत कमी ५०० रुपयांची गुंतवणुक करु शकता.

१००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळेल २० लाखांचा फंड – समजा तुम्ही दर महिना १००० रुपये गुंतवत असाल तर २० वर्षांनी तुम्हाला २० लाख रुपये कमावणे शक्य होते. हे गणित १२ टक्के वार्षिक व्याजावर मांडले आहे.

अशा प्रकारे बनवा ५० लाखांचा फंड – ७ वर्षांत ५० लाखांचा फंड तयार करण्यासाठी तुम्हाला दर महिना ४० हजार रुपये गुंतवावे लागतील. हे १२ टक्के सीएजीआर रिटर्न नुसार ठरवले जाते.

तज्ज्ञांच्या मते, गुंतवणुकीची सुरुवात मोठ्या रक्कमेमधुनच झाली पाहिजे असे काही नाही. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही १०० रुपये सुद्धा गुंतवु शकता. पण जर तुम्हाला SIP मध्ये गुंतवणुक करायची असेल. तर किमान ५०० रुपयांची गुंतवणुक करावीच लागेल. समजा तुम्ही नियमित दर महिना एवढी रक्कम गुंतवाल तर २० वर्षांत ही रक्कम ५ लाखांपर्यंत पोहचते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *