महिन्यातील काही निश्चित खर्चांपैकी एक खर्च म्हणजे विजेचे बिल. वीज बिल हा नेहमीच मासिक खर्चाचा मोठा भाग असतो. वीज बिल नेहमीच प्रयत्न करत असतात. काही वेळेस आपण अशा गोष्टींकडे लक्ष देत नाही ज्यामुळे वीज बिल निम्म्याहून कमी होते. आज आपण वीज बिल कमी येण्याचे सोपे उपाय सांगणार आहोत.
थंडीच्या मोसमात वीज बिलात मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसून येते. वीज बिल वाढले म्हणजे आपले बजेट देखील बिघडते. या जास्त येणाऱ्या वीज बिलाची समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी घरातील काही उपकरणं आपल्याला बदलावी लागतील, या सविस्तर जाणून घेऊयात…..
तुम्ही अजूनही जुने बल्ब वापरत असाल तर ते वापरणं आधी बंद करा. हे बल्ब विजेचे बिल झपाट्याने वाढवतात. त्यांच्यापासून मुक्त होऊन, आपण वीज वापर कमी करू शकता. त्याऐवजी घरात एलईडी बल्ब वापरणे सुरू करा. एलईडी बल्ब विजेचा वापर कमी करून मोठ्या बिलांपासून आपल्याला वाचवू शकतो. थंडीच्या दिवसात हीटरचा वापर सर्रास होतो. जर जास्त क्षमतेचा हीटर वापरत असाल तर ते लगेच काढून टाका. जास्त क्षमतेचे हिटर मोठ्या प्रमाणात वीज वापरतात आणि त्याचा थेट परिणाम बिलावर दिसून येतो. हीटरऐवजी ब्लोअर वापरणे किफायतशीर आहे. ब्लोअर सुरक्षित आहे तसेच ते कमी वीज वापरतो.
आजही अनेक घरांमध्ये पाणी गरम करण्यासाठी रॉड्स किंवा जुन्या पद्धतीचे गिझर वापरले जातात. या दोन्हींमध्ये वीजेचा जास्त वापर होतो. विजेचा जास्त वापर केल्यास बिलात वाढ होते. म्हणूनच आजच रॉड आणि जुन्या पद्धतीच्या गिझरऐवजी अत्याधुनिक गिझर घरात आणा. नवीन गीझरला 5 स्टार रेटिंग आहे का ते पाहून घ्या. 5 स्टार रेटिंग असलेले गीझर कमी वीज वापरतात ज्यामुळे आपले वीज बिल कमी करता येईल.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !