कधीही कोणताही व्यवसाय सुरू करण्यापूर्वी त्याची मार्केट व्ह्यॅ’ल्यु काय आहे, त्यात किती संधी आहे हे तपासून पाहणे आवश्यक आहे. या गोष्टीची नीट पडताळणी केली तर भविष्य़ात नुकसान होण्याचा धो’का कमी असतो. पण असा कोणताही व्यवसाय आहे का ज्याला सुरू करण्यापूर्वी मार्केट रिसर्च करण्याची गरज नाही?

आज आम्ही तुम्हाला अशा एका व्यवसायाबद्दल सांगणार आहोत ज्यामध्ये मंदी होत नाही. मंदीच्या काळातही या व्यवसायात मागणीवर फारसा परिणाम होत नाही. हा व्यवसाय म्हणजे डे’अ’री फा’र्मिं’ग. ज्यातून तुम्ही दूध उत्पादन करून भरपूर कमाई करू शकता. यामध्ये शासनाकडून अनुदानही मिळते.

दुग्ध व्यवसाय कसा सुरू करावा – दुग्धव्यवसाय सुरू करण्यासाठी, तुम्हाला सुरुवातीच्या टप्प्यात कमी गायी किंवा म्हशी घ्याव्या लागतील. भविष्यात वाढत्या मागणीनुसार जनावरांची संख्या वाढवता येते. यासाठी आधी गी’र जाती सारख्या चांगल्या जातीची गाय खरेदी करून तिची चांगली काळजी घ्यावी आणि त्यांच्या आहाराची योग्य काळजी घ्यावी. त्यामुळे अधिक प्रमाणात दुधाचे उत्पादन होते. तसेच उत्पन्न देखील वाढते. काही दिवसांनी तुम्ही गाय किंवा म्हशींची संख्या वाढवू शकता.

सबसिडी किती मिळते – डेअरी व्यवसायासाठी शासनाकडून २५ ते ५० टक्के अनुदान मिळते. हे अनुदान राज्यानुसार बदलू शकते. प्रत्येक राज्यात काही दूग्ध सहकारी संस्था आहेत, जी शेतकऱ्यांना दूध उत्पादनातून उत्पन्न वाढवण्यास मदत करतात. तुम्हालाही जर दुग्धव्यवसाय करायचा असेल, तर तुमच्या राज्यातील दूग्ध सहकारी संस्थेशी संपर्क साधा आणि कोणती कागदपत्रे लागतात याची चौकशी करा.

किती कमाई होईल – जर तुम्हाला १० गायींपासुन १०० लिटर मिळाले तर तुम्ही दूध कसे विकता यावर तुमचा नफा अवलंबून असतो. सरकारी डेअरीवर दूध विकल्यास सुमारे ४० रुपये प्रतिलिटर दर मिळतात, तर जवळपासच्या शहरातील अनेक दुकानांमध्ये किंवा मोठ्या सोसायटय़ांमध्ये हे दूध खासगीरीत्या विकल्यास ६० रुपयांपर्यंत दर मिळतो. दोन्हीची सरासरी घेतली तर तुम्ही ५० रुपये लिटरने दूध विकू शकता. अशा प्रकारे १०० लिटर दूध म्हणजे तुमचे रोजचे उत्पन्न ५००० रुपये होईल. म्हणजेच तुम्ही  एका महिन्यात १.५ लाख रुपये सहज कमवाल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *