मार्केट मध्ये अनेक कंपन्या विविध प्रकारच्या पॉलिसी योजना ऑफर करतात. मात्र, बहुतांश लोकांचा विश्वास हा सर्वात जुन्या आयुर्विमा महामंडळावर अजुनही कायम आहे. जेव्हा आपण सरकारी विमा कंपनी LIC कडून विमा घेण्याचा विचार करतो तेव्हा सर्वात आधी खिशाला कमी ताण देऊन जास्त फायदा देणाऱ्या विम्याचा शोधतो.

सामान्य माणसासाठी विमा काढण्यासोबतच त्यात किती गुंतवणूक करावी लागेल हेही महत्त्वाचे असते. ज्यांच्या घरात खूपच कमी उत्पन्न येत असेल किंवा घरात कोणीही कमावणारे नसेल अशा कुटुंबासाठी आज आम्ही एक उत्तम LIC पॉलिसी घेऊन आलो आहोत. या एलआयसीच्या सर्वोत्तम पॉलिसीबद्दल आम्ही तुम्हाला तपशीलवार माहिती देणार आहोत.
एलआयसीची ही पॉलिसी फक्त पुरुषांसाठी आहे.

आम्ही LIC च्या आधार स्तंभ पॉलिसीबद्दल बोलत आहोत. ही पॉलिसी फक्त पुरुषांसाठी ऑफर केली जाते. महिलांना कमी किमतीच्या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करायची असेल तर त्या आधारशिला पॉलिसी योजना घेऊ शकतात. मात्र, आज आम्‍ही तुम्‍हाला केवळ पुरुषांना असलेल्या सर्वात लहान पॉलिसी आधारस्तंभबद्दल सांगत आहोत. ही पॉलिसी ज्यांची कमाई कमी आहे अशांसाठी आहे.

एलआयसी आधार स्तंभ योजना – LIC ची आधारस्तंभ ही नियमित प्रीमियम पेमेंट पॉलिसी योजना आहे. यात पॉलिसीधारक पॉलिसी जितक्या वर्षांसाठी घेईल. त्याला तितक्या वर्षांसाठी प्रीमियम भरावा लागेल.या योजनेत सम अॅश्युअर्ड आणि लॉयल्टी अॅडिशन्स मॅच्युरिटीसह मिळतात.

आधारस्तंभ योजनेत सहभाग घेण्यासाठी लागणारी पात्रता – आधारस्तंभ पॉलिसीसाठी कमीतकमी ८ वर्षे वय असणे गरजेचे आहे. तर जास्तीत जास्त ५५ वर्षांपर्यंतची व्यक्ती या योजनेचा उपभोग घेऊ शकतो. ही पॉलिसी योजना कमीतकमी १० ते जास्ती जास्त २० वर्षांसाठी असते. या छोट्या पॉलिसीची विमा रक्कम रु. ७५ हजार आहे. ३ लाख रुपयांच्या विम्याच्या रकमेसह देखील याचा लाभ घेता येऊ शकतो.

आधारस्तंभयोजनेचा मृत्यू दावा – समजा जर एखाद्या व्यक्तीने २० वर्षांसाठी आधारस्तंभ योजना घेतली आणि दरम्यानच्या पॉलिसीधारकाचा कोणत्यातरी कारणास्तव मृत्यू झाला, तर कंपनीकडून मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना म्हणजेच नॉमिनीला १५ लाख रुपये दिले जातील. लॉयल्टी अॅडिशन्स हे पॉलिसी किती वर्षांपासून कार्यरत आहे यावर अवलंबून असते. पॉलिसीधारक पॉलिसीचा प्रीमियम जितका अधिक वर्षे भरेल तितका फायदा अधिक होईल.

५०० रुपयांपासुन २ लाख रुपयांचा फायदा – जर तुम्ही २० वर्षांसाठी १.५ लाख रुपयांची विमा रक्कम घेतली तर तुम्हाला 2 लाख रुपयांपर्यंतचा लाभ मिळू शकतो. यामध्ये तुम्ही दरमहा ५०० रुपयांपर्यंत प्रीमियम भरू शकता. ही योजना २० वर्षे पूर्ण झाल्यावर मॅच्युर होईल. अशावेळी, तुम्ही २० वर्षांसाठी दरमहा ५०० रुपये भरल्यास, प्लॅनच्या मॅच्युरिटीवर, तुम्हाला १.५ लाख रुपयांची विमा रक्कम तसेच लॉयल्टी अॅडिशन मिळेल. लॉयल्टी अॅडिशन म्हणून, तुम्हाला ४८ हजार ७५० रुपये मिळतील. अशा परिस्थितीत तुम्हाला प्लॅनच्या मॅच्युरिटीवर १.५ लाख रुपये आणि ४८ हजार ७५० रुपये म्हणजेच १ लाख ९८ हजार ७५० रुपये मिळतील.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *