पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ जानेवारी रोजी पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात २००० रुपयांचा १० वा हप्ता भरला आहे. आता सरकारने पीएम किसान सन्मान निधी योजना २०२२ मध्ये मोठा बदल केला आहे, याचा फरक १२ कोटींहून अधिक नोंदणीकृत शेतकऱ्यांवर पडणार आहे. यावेळी शेतकऱ्यांकडून विशेष सुविधा काढुन टाकण्यात आल्या आहेत. त्याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. निवडणुकीपूर्वी सरकारने हा बदल केला आहे.
हा बदल केला – मोदी सरकारने या योजनेत मोठा बदल केला आहे. आत्तापर्यंत शेतकरी नोंदणी केल्यानंतर स्वतःहून त्यांची स्थिती तपासू शकत होते. तुमच्या अर्जाची स्थिती काय आहे, तुमच्या बँक खात्यात किती पैसे आले आहेत किंवा ते कधी आले आहेत या सर्व गोष्टी तपासल्या जाऊ शकत होत्या. पण आता तुम्ही हे करू शकणार नाही.
आत्तापर्यंत कोणताही शेतकरी पीएम किसान पोर्टलला भेट देऊन त्याचा आधार क्रमांक, मोबाइल किंवा खाते क्रमांक किंवा त्याच्या हप्त्याची स्थिती जाणून घेऊ शकत होती. आता शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईल क्रमांकावरून स्टेटस पाहता येणार नाही. आता शेतकर्यांना त्यांच्या आधार आणि बँक खात्याद्वारेच स्थिती जाणून घेता येणार आहे.
का केले बदल – शेतकर्यांना मोबाईल क्रमांकावरून स्टेटस तपासणे सोपे होते, पण त्याचप्रमाणे ते नुकसानकारक देखील होते, प्रत्यक्षात अनेक लोक कोणत्याही मोबाईल क्रमांकावरून स्टेटस तपासत असत आणि अनेक वेळा इतर लोक सद्धा कोणाचीही माहिती मिळवुन घेऊ शकत होते. या सर्व गोष्टी बंद करण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे.
या योजनेचे फायदे – पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत, लाभार्थी शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी 2,000 रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात भरली जाते. जर अद्याप तुमच्या खात्यात पैसे भरले गेले नसतील तर सर्वप्रथम तुमची स्थिती आणि बँक खाते तपासून पहा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !