स्वताचे हक्काचे घर व्हावे यासाठी माणुस आयुष्यभर कष्ट करतो, राब राब राबतो. खुप सारे इन्व्हेस्टमेंट करतो. आणि त्यानंतर कुठे त्याचे घराचे स्वप्न सत्यात उतरते. मात्र इन्व्हेस्टमेंट एक्सपर्टच्या मते घर खरेदी करणे हे भावनात्मक असु शकते पण फायद्याचे नाही. ते कसे चला जाणुन घेऊ.

एक ब्रिटीश म्हण आहे, ती बहुतेकदा भाड्याच्या घरात राहणारे लोक वापरतात. भाड्याच्या घरात राहणे आणि गृहकर्ज ईएमआयमधून वाचवलेले पैसे वापरून अधिक बचत करणे खरोखरच शहाणपणाचे आहे. इन्व्हेस्टमेंट एक्सपर्टला जर विचारले तर त्याच्या मते एखाद्या व्यक्तीला कोणत्या शहरात स्थायिक व्हायचे हे ठरवता येत नसेल, तर त्याने घर घेणे उचित ठरत नाही. मोठ्या गृहकर्जाचे ईएमआय उगिच भरण्याऐवजी भाड्याच्या घरात राहणे चांगले. घर घेण्याच्या तर्काचा विचार न करता एखाद्याने स्वप्नातील घर खरेदी केल्यास घर खरेदी करणे हा भावनिक निर्णय असू शकतो.

कमाईपासून २० टक्के बचत करावी लागेल – गुंतवणूक तज्ञ CA राकेश चौधरी म्हणतात की, जर तुम्हाला कर्ज काढुन घर घ्यायचे असेल तर तुम्ही तुमच्या कमाईतील २० टक्के बचत करण्याचा आणि त्यानुसार EMI भरण्याचा विचार केला पाहिजे. बँका कोणत्याही घराच्या किंवा घराच्या एकूण किमतीच्या 80 टक्क्यांहून अधिक गृहकर्ज देत नाहीत. त्यामुळे गृहकर्ज घेणाऱ्याला एखाद्या बचतीतून मालमत्ता किमतीच्या अतिरिक्त 20 टक्के रक्कम साठवावी लागते.

तसेच, स्टॅम्प शुल्क आणि इतर काही छोटे मोठे खर्च आहेत जे बँकेच्या कर्जामध्ये समाविष्ट होत नाहीत, त्यामुळे त्याबद्दल देखील विचार करावा लागतो. त्यामुळे घर घेण्यापूर्वी आपली बचत किती आहे हे तपासुन घेणे आवश्यक आहे. गृहकर्जासाठी अर्ज करताना इतर घटकांचा विचार केला पाहिजे. घर विकत घेऊ इच्छिणारी व्यक्ती अल्प कालावधीसाठी एखाद्या शहरात राहणार असेल किंवा ज्या शहरात भविष्यात राहण्याचा त्याचा विचार नसेल तर भाड्याच्या घरात राहणे हा एक चांगला पर्याय आहे.

35 लाखांच्या घरासाठी बँक फक्त 28 किंवा 30 लाख रुपये देतात – भाड्याच्या घरात राहिल्यामुळे ठराविक कालावधीत संपत्ती जमा करण्यास मदत होते. ज्यातून तो भविष्यात घर खरेदी करण्यासाठी पैसे जमा करू शकतो, असे तज्ञांचे म्हणणे आहे. जर तुम्ही घाईघाईत घर विकत घेतले असेल आणि तुम्हाला तिथे राहायचे नसेल, तर तुम्ही गृहकर्ज प्रक्रियेत खर्च केलेले पैसे तुम्हाला परत मिळत नाहीत.

जर तुम्हाला ३५ लाख रुपयांचे घर घेण्यासाठी स्टॅम्प शुल्क, नोंदणी शुल्क, ब्रोकरेज इत्यादी भरावे लागतील, तर तुम्हाला सुमारे ५ लाख रुपये द्यावे लागतात. या सर्व खर्चासह घराची एकूण किंमत सुमारे ४० लाख रुपये असेल. बँका ८० टक्क्यांपेक्षा जास्त कर्ज देत नसल्यामुळे, बँक तुम्हाला फक्त २८ लाख रुपये गृहकर्ज देतात . बँकेने ८५ टक्के कर्ज दिले तरी तुम्हाला ३० लाख रुपयेच मिळतील. २० वर्षांच्या कालावधीत ३० लाखांच्या गृहकर्जासाठी मासिक EMI सुमारे २५००० रुपये असेल.

म्युच्युअल फंड किंवा एसआयपी हा एक चांगला पर्याय आहे – जर तुम्हाला घर घ्यायचे असेल तर म्युच्युअल फंड किंवा SIPद्वारे ते खरेदी करणे एक चांगला पर्याय असू शकतो. तुमच्या २० वर्षांच्या गुंतवणुकीवर किमान १२ टक्के वार्षिक परतावा मिळेल. ३५ लाख रुपयांचे घर विकत घेऊ पाहणारा कोणताही व्यक्ती वार्षिक मालमत्ता किमतीच्या २.५ ते ३ टक्के रक्कम मिळण्याची शक्यता असते. तर व्यावसायिक मालमत्तेतील उत्पन्न ८ ते १२ टक्क्यांपर्यंत असू शकते.

रिअल इस्टेटचे भाडे देखील दरवर्षी सुमारे पाच टक्के दराने वाढते. त्यामुळे मालमत्ता किमतीच्या तीन टक्के वार्षिक दराने गृहीत धरल्यास, ३५ लाख रुपये किमतीच्या मालमत्तेसाठी वार्षिक सुमारे १०५००० रुपये किंवा ८७५० रुपये प्रति महिना भरावे लागतील, तर घर खरेदी करण्यासाठी दरमहा रुपये २५००० भरावे लागतील. जर एखाद्या व्यक्तीने ३५ लाखांचे घर घेण्याऐवजी भाड्याच्या घरात राहण्याचा निर्णय घेतला तर तो त्याच्या मासिक ईएमआयमधून दरमहा १६२५० रुपये वाचवू शकेल. जर घर खरेदीदाराने हे रु. १६,२५० मासिक म्युच्युअल फंड SIP मध्ये २० वर्षांसाठी गुंतवले तर २० वर्षांनंतर ते १.५० कोटी रुपये होतील.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *