गायक रोहित राऊत आणि गायिका जुईली जोगळेकर यांचा साखरपुडा संपन्न !!

105

हल्ली जिथे पाहावं तिथे लगीनघाई सुरु आहे. अनेक कलाकार आपल्या जोडीदारासंगे आपले नाते सर्वांच्या साक्षीने पूर्णत्वास नेत आहेत. आता या कलाकारांच्या यादीमध्ये संगीत क्षेत्रातील एका जबरदस्त जोडप्याचा समावेश झाला आहे. मराठी लिटिल चॅम्प्स फेम रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर हे येत्या २३ जानेवारीला विवाहबंधनात अडकणार आहेत.

नुकताच त्यांचा साखरपुडा देखील झाला आहे. सध्या चाहत्यांसोबत सर्वांचेच लक्ष यांच्या विवाहाकडे लागले आहे.
रोहित आणि जुईली अनेक काळापासून रिलेशनशिपमध्ये आहेत, सोशल मीडियावर दोघे ही फार ऍक्टिव्ह असून अनेक पोस्ट ते दोघे शेयर करत असतात. एकमेकांसोबतचे फोटो पोस्ट करत वेळोवेळी एकमेकांवरील प्रेम ते दाखवत असतात.

चाहते देखील त्यांच्या या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करतात. त्यांच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांचे फोटो देखील सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. रोहित आणि जुईली दोघे ही त्यांचे लग्न ठरल्यापासून सोहस्ल मीडियावर काही खास क्षणचित्रे पोस्ट करताना दिसत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by fillamwala (@fillamwala)


दोघांनी जेव्हा प्रेमाची कबुली एकमेकांना दिली तेव्हाच सेल्फी, रिलेशनशिपमध्ये आल्यानंतर पहिल्यांदा एकत्र गायलेलं गाणं तेव्हाचा फोटो असे फोटो दोघांनी ही शेयर केले आहेत. सोबतच लग्नासाठीचं काऊंटडाऊन आणि रोहिली असे हॅशटॅग्स वापरले आहेत. संगीत क्षेत्रातील या जोडप्याला त्यांच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा…..

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !