रेल्वे स्टेशनचे नाव पिवळ्या रंगाच्याच पाटीवर का लिहले जाते जाणून घ्या !

92

आपल्याकडे रेल्वेला जीवनवाहिनी असे म्हटले जाते. प्रत्येकाने त्यांच्या आयुष्यात एकदातरी रेल्वेने प्रवास केलाच असेल. आणि समजा केला नसेल तर किमान रेल्वे स्टेशन तरी पाहिलेच असेल. प्रत्येक रेल्वे स्टेशन वर त्य़ा स्थानकाचे नाव आणि त्या रेल्वे स्थानकाची समुद्रसपाटीपासुनची उंची लिहीलेली असते. हे बोर्ड जर तुम्ही नीट बारकाईने पाहिलात तर तुम्हाला ते सगळेच पिवळ्या रंगाचे असल्याचे दिसेल. पण त्या मागचे कारण तुम्हाला माहित आहे का.. जर नसेल तर आम्ही तुम्हाला त्या मागचे कारण सांगतो.

या कारणामुळे असतो पिवळा रंग – पिवळा रंग हा सूर्यासारख्या चमकदार रंगावर आधारित आहे. पिवळा रंग सुख, बुद्धी, उर्जेशी संबंधित असतो. गर्दीच्या पिवळा रंग इतर बॅकराउंडपेक्षा उठुन दिसतो. शिवाय वास्तुशिल्प आणि मानसोपचारतज्ज्ञांचा विचार करुन पिवळ्या रंगाचा वापर होतो. पिवळ्या रंगाच्या बॅकराउंडवर काळ्या रंगाचे लिखाण दुरुनही खुप उठुन दिसते.

धोक्यासाठी लाल रंगाचा वापर केला जातो – धोक्याची सुचना देण्यासाठी लाल बॅकराउंडवाल्या साइनबॉर्डवर पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाचे लिखाण असते. लाल रंग खुप गडद असल्यामुळे तो दुरनही धोक्याचा इशारा देतो. रस्त्य़ांसोबतच रेल्वेवाहतुकीतही लाल रंगाचा वापर केला जातो. गाड्यांच्याही पाठी लाल रंगाच्या लाइटस् असतात. त्यामुळे त्या वाहनाच्या पाठी असणाऱ्या गाड्यांना देखील पुढे गाडी असल्याचा इशारा मिळतो.

प्रत्येक रंगाची फ्रिकव्हेंन्सी – आपल्या जीवनात रंग हे महत्वाची भुमिका निभावत असतात. प्रत्येक रंगाची स्वताची फ्रिकव्हेंन्सी आणि वेव्हलेंथ असते. त्याच्या मदतीने आपल्याला ते रंग पाहता येतात. जसे आपण लाल रंगाला धोक्याचा इशारा म्हणुन समजतो. तसेच पिवळ्या रंगाला आकर्षित करण्यासाठी वापराल जातो.

लाल रंगाची वेव्हलेंथ सर्वात जास्त – विज्ञानाच्या दृष्टीने जर पाहायचे झाल्यास (VIBGYOR) तानापिहीनिपाजा म्हणजेच इंद्रधनुच्या सिद्धांतानुसार ते वर्गीकृत केले जाते. यात ता म्हणजे तांबडा, ना म्हणजे नारंगी, पि म्हणजे पिवळा , हि म्हणजे हिरवा, नि म्हणजे निळा, पा म्हणदे पारवा, जा म्हणजे जांभळा. या सात रंगात लाल रंगाची वेव्हलेंथ सर्वात जास्त असते. त्यामुळेच तो दुरनही दिसतो. लाल रंगाचा वापर वाहतुकीच्या नियमात संकेत म्हणुन केला जातो.

धुक्यात सुद्धा पिवळा रंग उठुन दिसतो – लाल रंगानंतर पिवळ्या रंगाची वेव्हलेंथ सर्वात जास्त असते. त्याला सुद्धा दूरुन पाहिले आणि ओळखले जाऊ शकते. त्यामुळेच शाळेच्या गाड्यांचा रंग हा पिवळा असतो. जेणेकरुन लोकांना समजावे त्यात लहान मुले आहेत. वाहनांचा वेग कमी करावा. पिवळा रंग हा पाऊस, धुक, धुरामध्ये सुद्धा ओळखला जाऊ शकतो.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !