फेब्रुवारी महिना उजाडला कि प्रेमीयुगलांना वेलेंटाइन डे चे वेध लागतात. हा दिवस एकमेकांसोबत घालवण्यासाठी प्रत्येक जोडपे उत्सुक असतात. अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांचा देखील लग्नानंतरचा पहिलाच वेलेंटाइन डे आहे. पण सलमान खानने या कपलच्या सेलिब्रेशनचा चुराडा केला आहे.

त्यामुळे कतरिना आणि विकी हा दिवस एकसाथ साजरा करु शकत नाही. सलमान आणि कतरिनाचा टायगर ३ ची अंतिम शुटींग जानेवारी २०२१ मध्ये सुरु होणार होती मात्र कोरोनामुळे ती शुटींग पुढे ढकलण्यात आली. आता या चित्रपटाची शुटींग फेब्रुवारी मध्ये सुरु होणार असल्याचे म्हटले जाते.

१४ फेब्रुवारीला सुरु होणार शुटींग – १५ दिवस सलग या चित्रपटाचे शुटींग शेड्युल तयार असल्याचे म्हटले जाते. या चित्रपटाचे दिग्दर्शक मनीष शर्मा यांना चित्रपटाचे काही सीन दिल्लीच्या रस्त्यांवर शुट करायचे आहेत. सलमान लाल किल्ल्यासोबत शहरातील काही ऐतिहासिक ठिकाणी सुद्धा शुट करणार आहे. कोविडचे सगळे नियम पाळुनच चित्रपटाचे शुटींग करण्यात येणार आहे.

१२ किंवा १३ फेब्रुवारीला सलमान आणि कतरिना दिल्लीसाठी रवाना होणार आहेत. १४ फेब्रुवारीपासुन शुटींग सुरु होणार आहे. त्याआधी सलमान ५ फेब्रुवारी पासुन त्याच्या मुंबईतील सेटवर तो काही सीन एकटा शुट करणार आहे.

कॅटच्या लग्नात सलमानच्या अनुपस्थितीवर प्रश्न – टाइगर 3 मध्ये सलमान खान आणि कैटरीना कैफ सोबत इम्रान हाश्मीसुद्धा महत्वाच्या भुमिकेत दिसणार आहे. मात्र याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. ९ डिसेंबरला जेव्हा कतरिना आणि विकी कौशलचे लग्न झाले त्यावेळी सलमान उपस्थित नव्हता त्यामुळे अनेकांना याबाबत प्रश्न पडले. काहींच्या मते सलमानला स्वताला त्या लग्नात सहभागी व्हायचे नव्हते तर काहींच्या मते कतरिनाने त्याला आमंत्रण दिलेच नव्हते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *