बॉलीवुड अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख ने आपले अवयव दान करण्याचा निर्णय घेतला आहे . जेनेलिया ने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर एक विडिओ शेयर केला आहे, ज्याच्यामध्ये ती आणि रितेश पांढऱ्या कपड्यामध्ये दिसत आहेत. दोघे या वीडियो मध्ये आपल्या या निर्णया विषयी आपल्या चाहत्यांना सांगत आहेत आणि चाहत्यांनाही असा निर्णय घेण्याचे आव्हान करत आहेत. विडिओ मध्ये रितेश सांगतो,” मी आणि जेनेलिया ने या विषयी खूप विचार केला आणि खूप चर्चाही केली, पण दुर्भाग्यवश आत्तापर्यंत काही सांगू शकलो नाही. परंतु आज 1 जुलै दिवशी आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो कि आम्ही दोघांनी एक प्रण घेतला आहे. आम्ही आपले अवयव दान करण्याचा निर्णय घेतला आहे. जेनेलिया विडिओ मध्ये सांगत आहे, “हो आम्ही आमचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला आहे आम्हाला वाटतंय कि एखाद्याचा जीव वाचवण्याहून मोठी आणि सर्वोत्तम भेट कोणतीही असू शकत नाही. म्हणून मी सर्व चाहत्यांना सांगू इच्छिते कि जर तुम्हाला समाजासाठी, लोकांसाठी काही करायची इच्छा असेल तर कृपया पुढे या.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *