आशियामधील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळख असलेले आणि रिलायन्स कंपनीचे मालक मुकेश अंबानी हे त्यांच्या आलिशान जीवनशैलीसाठी देखील ओळखले जातात. त्यांची अँटिलिया ही बिल्डिंग असो, कंपनीमधील कामं करण्याची त्यांची पद्धत, त्यांचं, कुटुंबाचे राहणीमान या व अशा गोष्टी नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. मुकेश अंबानी यांचे घर ‘अँटिलिया’ हे जगातील सर्वात मौल्यवान घरांपैकी एक आहे. सोबतच अंबानींच्या कार कलेक्शनमध्ये एकापेक्षा एक महागड्या कारचा समावेश आहे.

कारच्या बाबतीत आता मुकेश अंबानींच्या नावावर आणखी एका खास कारची भर पडली आहे. अंबानी आणि त्यांच्या कुटुंबाकडे अनेक आलिशान आणि मौल्यवान कार आहेत, परंतु आता अंबानींनी खरेदी केलेल्या कारने त्यांच्या नावावर आणखी एक खास कारची मालकी नोंदवली आहे.

अंबानी यांनी अलीकडेच एक नवीन कार खरेदी केली आहे, ज्याची किंमत सुमारे १३ कोटी रुपये आहे आणि अंबानी भारतातील सर्वात महागडी कार असलेले व्यक्ती बनले आहेत. अंबानींच्या ताफ्यामध्ये नवीन चमकणारी रोल्स रॉयस एसयूव्ही गाडी आली आहे. ही कार त्यांच्या आत्तापर्यंतच्या कारमध्ये सर्वात महागडी, लक्झरी आणि खास कार आहे.
अल्ट्रा-लक्झरी रोल्स रॉयस हॅचबॅकचा आता अंबानींच्या कार कलेक्शनमध्ये समावेश करण्यात आला आहे.

सर्वप्रथम, कारची खासियत म्हणजे तिची किंमत १३.१४ कोटी रुपये आहे. त्याच बरोबर या कारची वैशिष्ट्ये देखील आश्चर्यकारक आहेत. ही कार आता देशातील सर्वात महागडी कार बनली आहे आणि ती खरेदी करणारे मुकेश अंबानी सर्वात महागडी कार असलेले भारतीय बनले आहे.

अंबानींनी १३ कोटींची कार खरेदी केली आहे, तर मग त्या कारचा नंबरही तितकाच खास असायला हवा. मिळालेल्या माहितीनुसार, अंबानींनी व्हीआयपी नंबरसाठीच १२ लाख रुपये खर्च केले आहेत. कारचा क्रमांक “0001” असा आहे.
20 लाख कर भरला…

या आलिशान आणि मौल्यवान कारसाठी अंबानी यांनी रस्ता सुरक्षा करासाठी ४०,००० रुपये आणि २० लाख रुपयांचा एकरकमी कर भरला आहे. प्राप्त माहितीनुसार, त्याची नोंदणी ३० जानेवारी रोजी झाली होती आणि त्याची नोंदणी १५ वर्षांसाठी म्हणजेच ३० जानेवारी २०३७ पर्यंत वैध आहे. या कंपनीची कार अजय देवगण आणि भूषण कुमार यांच्याकडेही आहे, मात्र तिची किंमत यापेक्षा कमी आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *