बॉलिवुडचा सलमान खान गेली ३-४ दशके प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. या कालावधीत तो अनेकदा चर्चेत राहतो. काही दिवसांपुर्वीच तो अंतिम चित्रपटाच्या प्रमोशनसाठी त्याच्या बहिणीचा नवरा आयुष शर्मा सोबत दिसत होता. यावेळी त्याने अनेक इव्हेंट आणि रियालिटी शो मध्ये सहभाग घेतला होता.

याचसाठी तो आणि आयुष ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये गेला होता. यावेळी त्यांच्यासोबत महिमा मकवाना आणि डायरेक्टर महेश मांजरेकरसुद्धा गेले होते. या शो दरम्यान सलमानने आता ही तो १ बीएचके मध्ये का राहतो या मागील कारण देखील सांगितले.

शो दरम्यान कपिल शर्माने सलमानला विचारले कि तो त्याच्या खऱ्या आयुष्यात अजुनही १बीएचके मध्येच राहतो. तु यावर अधिक खर्च करु शकत नाहीस का. या वर सलमानने उत्तरले की, ज्या गोष्टींवर तुम्ही खर्च करु इच्छिता अशाच गोष्टींवर खर्च होता. पण आजकाल ती गोष्ट सुद्धा खुप कमी होत चालली आहे. सलमानचे हे उत्तर ऐकुन तेथे उपस्थित लोक हसु लागले. सलमानला जास्त पैसे खर्च करायला आवडत नसल्याचे त्याने सांगितले.

सलमाननंतर कपिलने आयुशला प्रश्न विचारला. कि तुम्ही जेव्हा घरी भेटता तेव्हा तुम्ही परिवारातील सदस्यांप्रमाणे असता पण जेव्हा चित्रपटाच्या सेटवर भाईजानच्या समोर असता तेव्हा काय फरक असतो. यावर आय़ुषने सांगितले कि त्यात खुपच फरत असतो. चित्रिकरणाच्या प्रत्येक दोन तीन दिवसांनी आमची भेट होते. त्यानंतर मजा मस्ती करत आम्ही घरी परत जातो.

असेच एकदा अर्पिता बाहेर गेली असताना मी भाईला भेटण्यासाठी गेलो तेव्हा ते मला म्हणाले कि तु खुप अजीब माणुस आहेस. तु सारखा सारखा इथे का येतोस. हा किस्सा ऐकुन सलमान खान, कपिल शर्मा आणि अर्चना पूरन सिंह जोर-जोरात हसु लागले. त्यानंतर सलमानने अर्चना पूरन सिंह सोबत ‘पहला-पहला प्यार है’ गाण्यावर डान्स केला.

सध्या सलमान त्याचा आगामी चित्रपटच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. त्याच्यासोबत अभिनेत्री कतरिना कैफ सुद्धा शुटींगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात सलमान खान एका सैनिकाच्या भुमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट एका भारतीय जासुसावर आधारित आहे. टायगर सिरीजमधील ही पहिलीच रियल स्टोरी आहे. या चित्रपट म्हणजे एक भारतीय जासुसची कहाणी आहे जो देशासाठी त्याचा हिंदु धर्म सोडुन पाकिस्तानात जाऊन एका पाकिस्तानी मुलीशी लग्न करतो. त्याच गुप्तहेरामुळे भारत पाक युद्धावेळी भारताला जिंकण्सास कारण ठरलेली माहिती मिळाली होती. भारताच्या या गु’प्त’हेराने पाकिस्तानी मुली सोबत लग्न तर केलेच पण त्यासोबत पाकिस्तानी सेनेत सुद्धा भरती झाला होता.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *