केंद्रीय परिवहन मंत्री नितिन गडकरी यांनी देशात कुठेही गाडी चालवते वेळी फोनवर बोलणे आता अपराध नसल्याचे जाहीर केले आहे. पण त्यासाठी नवे नियम तयार केले आहेत. या नियमांत ड्रायव्हिंग करते वेळी फोनवर बोलणे गुन्हा असणे ही श्रेणी नियमांमधुन वगळली आहे. पण याचा अर्थ हा नाही कि तुम्ही गाडी चालवते वेळी सर्रास फोनवर बोलावे. जर तुम्ही अन्य नियमांचे पालन करत असाल तरच तुम्ही फोनवर बोलु शकता. लोकसभेत बोलतेवेळी गडकरी यांनी सांगितले कि कारमध्ये फोनवर बोलण्यासाठी काही नियमांचे पालन करावे लागेल.
नियमांनुसार कारमध्ये मोबाईल हॅण्ड फ्रि लावला असेल तरच गाडी चालवते वेळी फोनवर बोलण्याची अनुमती दिली जाईल. तसेच हॅण्ड फ्रि साठी कोणते ही कर कापला जाणार नाही. तसेच फोन कार मध्ये नाही तर हॅण्ड फ्रि वर बोलताना तो पॉकेटमध्ये असावा.
याचाच अर्थ हॅण्डस् फ्रि वर बोलताना पोलिसांनी फाईन मारलाच तर या विरोधात कोर्टात तुम्ही आवाहन देऊ शकता. ड्राइव्हर कारमध्ये जर हॅण्डस् फ्रि वर बोलत असेल तर ते आता दंडनीय नाही. अशा वेळी ट्राफिक पोलिस देखील चालन कापणार नाही. आणि जर कापलेच तर तुम्ही कार्टात यांची नोंद देऊ शकता.
सप्टेंबर २०२१ मध्ये राजमार्ग मंत्रालयात सांगितले होते कि ड्रायव्हरने केवळ नेव्हिगेशन साठीच फोन वापरावा. मात्र या वेळी सुद्धा त्याचे लक्ष विचलित होणार नाही याची काळजी घेण्यात यावी.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !