इंडियन गोल्ड मॅन अशी ओळख असलेले बप्पी लहरी हे सुप्रसिद्ध संगीतकार आणि गायक होते. बॉलिवुडमध्ये पॉप म्युझिक आणि डिस्को प्रकार आणणाऱ्या बप्पी लहरी यांचा जन्म २७ नोव्हेंबर १९५२ मध्ये पश्चिम बंगाल मधील जलपाईगुड़ी येथे झाला. पण दुर्दैवाने ते आज आपल्यात नाही. कोरोना मुळे त्यांचा मृत्यु झाल्याचे बोलले जाते.

बप्पी दा हे त्यांच्या संगीतासोबतच सोन्यासाठी सुद्धा प्रसिद्ध होते. त्यांना नेहमी गॉगल लावुन फिरायला खुप आवडयचे. अनेकदा ते वेगवेगळ्या रियालिटी शो मध्ये सुद्धा हजेरी लावायचे त्यावेळी पण त्यांच्या डोळ्यांवर गोगल आणि हातात सोन्याच्या अंगठ्या महागडी घड्याळं आणि गळ्यात मोठ्या सोन्याच्या चैनी असा त्यांचा पेहराव असायचा. रियालिटी शो मध्ये गेल्यावर स्पर्धकांवर खुष होऊन ते त्यांना सोन्याच्या चैनी सुद्धा भेट द्यायचे. त्यांचा संपुर्ण परिवार संगीताशी निगडीत असल्यामुळे त्यांनी वयाच्या तिसऱ्या वर्षी तबला वादन शिकले. आज त्यांच्या पाठी किती रुपयांची संपत्ती आहे ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

बप्पी लहरी यांचे खरे नाव आलोकेश लहिरी असे आहे. २०१४ मध्ये ते बीजेपी कडुन पश्चिम बंगाल इथील सीरमपुरच्या लोकसभा निवडणुक लढवत होते. त्यावेळी त्यांचे इफिडेविट जमा केले होते. त्यानुसार त्यांच्याकडे ७५४ ग्राम सोने होते. ज्याची किंमत 17,67,451 लाख रुपये आहे.

गोल्डचे शौकिन असलेल्या बप्पी दां कडे १२ करोड रुपयांची संपत्ती होती. तसेच त्यांच्याकडे बीएमडब्ल्यू आणि ऑडीसुद्धा होती. त्यांच्याकडील टेस्ला X कार ची किंमत 55 लाख रुपये होती. बप्पी दां कडे ४.६२ किलोची चांदी देखील होती ज्याची किंमत साधारण 2,20,000 रुपये आहे. एवढेच नव्हे तर त्यांनी हिट गाण्यांच्या आठवणींखातर गोल्ड प्लेटेड डिस्क लावली आहे.

बप्पी लहरी यांनी त्यांच्या वयाच्या १९ व्या वर्षी त्यांच्या करियरची सुरुवात केली होती. मुंबआत आल्यानंतर त्यांना पहिला ब्रेक १९७२ मध्ये बंगाली चित्रपट दादु मध्ये मिळाला. त्यानंतर १९७३ मध्ये त्यांनी शिकारी चित्रपटासाठी गाणी कंपोज केली. ९० च्या दशकात त्यांनी अनेक सुपरहिट साउंड ट्रॅक तयार केले होते. त्यात वारदात’, ‘डिस्को डांसर’, ‘नमक हलाल’, ‘डांस डांस’, ‘कमांडो’, ‘गैंग लीडर’, ‘शराबी’ या चित्रपटांचा सहभाग आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *