‘आई कुठे काय करते’ मालिकेला मिळणार अनपेक्षित वळण, अनघा उचणार हे मोठे पाऊल !

119

टीआरपी लिस्ट मध्ये राहण्यासाठी प्रत्येक वाहिन्या त्यांच्यावर प्रसारित होणाऱ्या मालिकांमध्ये ट्विस्ट घेऊन येत असतात. सध्या अनेक वेगवेगळ्या मालिकांमध्ये रंजक ट्विस्ट आलेले दिसत आहेत. स्टार प्रवाहावरील आई कुठे काय करते ही मालिका नेहमीच वेगवेगळ्या रंजक वळणावर कथानक प्रसारित करत असते.

आय़ुष्यभर घरच्यासाठी जीवाचं रान करणारी आई. जी स्वताच्या पायावर उभ राहायचा प्रयत्न करत असेल तर तिला कोणकोणत्या अडचणींना सामोरे जावे लागते याबाबत या मालिकेत दाखवण्यात आले आहे. अभि-अनघाच्या लग्नानंतर अरुंधती स्वताच्या करियरला सुरुवात करते हे आपण पाहिले. त्यासाठी तिला तिच्या शाळेतला मित्र आशुतोष मदत करत आहे. नुकतेच या दोघांनी त्याच्या पहिल्या वहिल्या अल्बमचे पहिले गाणे रेकॉर्ड केले.

या गाण्याला मिळत असलेल्या प्रतिसाद तसेच अरुंधतीचे स्वकर्तृत्व कुठेतरी अनिरुद्धच्या डोळ्यात खुपत असल्यामुळे तो तिच्या चारित्यावर शिंतोडे उडवताना आपण मागील काही एपिसोड मध्ये पाहिले. स्वतावर झालेले आरोप सहन न झाल्याने अरुंधती घर सोडुन जाण्याचा निर्णय घेते. तिच्या या निर्णयाला अनिरुद्ध ,अभि. आणि कांचनमाला सोडुन घरातील इतर सर्व सदस्य पाठिंबा ही देतात.

येणाऱ्या पुढच्या भागात अरुंधतीला चुकीची वागणुक दिल्यामुळे संतापलेली अनघा, अभि अनिरुद्धवर वर बरसणार आहे. त्यावेळी अभि तिच्यावर आवाज चढवतो तेव्हा हाच आवाज तुझा बाबा मगाशी बोलत होते तेव्हा कुठे गेलेला असा जाब अनघा पुढील भागात विचारणार आहे. अरुंधतीसाठी दुखावलेली अनघा या पुढे अरुंधतीला त्रास देणाऱ्यांचे काहीच काम करणार नसल्याचे ठणकावुन सर्वांना सांगते. तिच्या या अवतारावर सगळेच जण निरुत्तरीत होताना आपण पुढच्या भागात पाहणार आहोत.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !