“माझी तुझी रेशीमगाठ” हि झी मराठीवरील मालिका थोड्याच काळात फार लोकप्रिय झाली आहे. मराठीतील सुप्रसिद्ध कलाकार या मैकेचा भाग असून छोटी मेरा देखील सर्वांचं मन जिंकत आहे. सध्या ही मालिका फारच मनोरंजक वळणावर आली आहे, यश नेहाच्या प्रेमात पडल्याची त्याला जाणीव झाल्यांनतर त्याने स्वतःचं सत्य सांगत नेहाला प्रपोज केलं आहे, पण नेहाने हे अमान्य केलं आहे.
पण आता हळू हळू जेव्हा नेहाला यशबद्दल कुठेतरी भावना लागल्यात हे तिच्या वागण्यातून दिसू लागलं आहे. नेमकं तेव्हाच या मालिकेत एक ट्विस्ट आला आहे, यशची जेसिका नावाचे नवे पात्र या मालिकेत आले आहे. या मालिकेतील समीर नेहाला सांगतो की, जेसिका ही यशची एक्स गर्लफ्रेंड आहे आणि हे ऐकल्यानंतर तिची यश सोबतची जवळीक नेहाला खटकत असल्याचे दिसत आहे.
याच मालिकेतील आगामी भागाचा प्रोमो अतिशय मजेशीर वळण देणारा आहे. जेसिका नेहाला म्हणते की, तू मला जेवण बनवायला शिकवणार आहेस ना, यशला इम्प्रेस करायचं आहे. हे ऐकून नेहाचा चेहऱ्यावर चकित असल्याचे भाव असतात. पुढे यश, नेहा, समीर आणि जेसिका कारमधून घरी जात असतात, नेहा आणि समीर मागे तर यश आणि जेसिका पुढे बसलेलं असतात आणि जेसिका कार चालवत असते.
View this post on Instagram
तितक्यात जेसिका यशला म्हणते, आपण लॉन्ग ड्राइव्हला जायचं का, सोबतच ती त्याचा हात देखील पकडते आणि सांगत असते की परदेशात देखील आपण असेच फिरायला जायचो, ट्रेकिंगला जायचो. हे सगळं ऐकून नेहाच्य चेहऱ्यावरचे रंग उडत असतात. तिचा आतल्या आत जळफळाट होत असलेला तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत असतो. तर एका बाजूला यशची चलबिचल मात्र सुरु असते.
आता मालिकेत पुढे काय घडणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. यशासाठी मनात असलेलं प्रेम जेसिकाच्या येण्याने नेहा यशसमोर व्यक्त करू शकेल का? हे आपल्याला मालिकेत पुढे पाहायला मिळेल.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !