गेल्या काही दिवसांत पुष्पा चित्रपटामुळे साऊथ सुपरस्टार अल्लु अर्जुन बराच चर्चेत आहे. पुष्पाने बॉक्स ऑफिसवर ३०० करोड रुपयांचा गल्ला जमावला. या चित्रपटामुळे बॉलिवुडमध्ये सुद्धा अल्लु अर्जुनची डिमांड वाढली आहे. अल्लु अर्जुनने त्याच्या जबरदस्त अभिनयाने आणि स्टाइलने सर्वांची मने जिंकुन घेतली आहेत. त्यामुळे त्याचे चाहते आता संपुर्ण जगभरात पसरले आहेत.

अल्लु अर्जुन हा साऊथकडील सुपरस्टार चिरंजीवी यांचा भाचा आहे. अल्लु ची लाईफस्टाईलसुद्धा खुप लग्नझरीयस आहे. आज आम्ही तुम्हाला अल्लु अर्जुनच्या वॅनिटी आणि नेटवर्थबद्द्ल सांगणार आहोत. अल्लु अर्जुनचे नाव साउथच्या सर्वात जास्त फिस घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे. आलीशान घर, करोडोच्या गाड्या , लग्जरीस लाईफ स्टाइल मध्ये तो अगदी राजकुमारासारखा राहतो.

मीडिया रिपोर्टस् नुसार अल्लु अर्जुनाचा वार्षिक इन्कम हा ३२ करोड हुन अधिक आहे. तर त्याचे नेटवर्थ ३५० करोड रुपयांच्या आसपास आहे. तो एका चित्रपटासाठी १५ करोड रुपये चार्ज करतो. तर वैकुंठपुरमल्लों चित्रपटासाठी त्याने तब्बल २५ करोड रुपये घेतले होते. तसेच तो एका एॅडच्या ब्रांड एंडोर्ससाठी३ करोड रुपये चार्ज करतो.

अल्लु अर्जुनच्या हैदराबादमधील बंगल्याची किंमत १०० करोड रुपये आहे. तर जुबली हिल्स येथील घर त्याने पॉपुलर इंटीरियर डिजाइनर आमिर आणि हामिदा से डेकोरेट केले आहे. हे घर बॉक्स शेप मध्ये असेल तसेच त्यात जास्त डिझाईन नसेल या गोष्टीचा विचार करुन तयार केले आहे. घरात लिविंग रूम, डाइनिंग, किचन से बार काउंटरपर्यंत सर्व फॅसिलिटी आहे. अल्लु अर्जुन सोशल मीडियावर अनेकदा त्याचे फोटो व्हिडीओ शेअर करत असतो त्यात त्याचे घर दिसते. त्या फोटोमध्ये दिसते कि त्याच्या घरात मुलांना खेळायला लॉनसुद्धा आहे.

त्याच्या घराच्या लिविंग रुम ला ऑल व्हाइट टच दिला आहे. तिथे लाइटिंगसुद्धा व्हाइटच दिली आहे. अल्लुने त्याच्या पत्नीसोबत एक फोटो शेअर केला होता त्यात त्याच्या लिविंग रूम चा मिनिमालिस्टिक डेकोर पाहण्ययास मिळाला होता. त्याच्या घराच्या किचन मध्ये टॉप शेफ जेवण बनवतात. त्या किचनला पण व्हाईट टच दिला आहे. तिथेच मरुन रंगाचा एक डायनिंग टेबल पण आहे. त्याच्या अलिशान घरात स्विमिंग पुल सुद्धा आहे. त्याच्या शेजारीच छानसा गार्डन एरिया तयार केला आहे.

त्याच्याकडे ४-५ करोडच्या लग्झरी कार आहेत. त्या कलेक्शन मध्ये रेंज रोवर, ऑडी आणि BMW सीरिज मध्ये BMW X6 Coupe कार आहे ज्याचा नंबर ६६६ असा आहे. याशिवाय त्याच्याकडे जगुआर आणि पोर्शे सारख्या महागड्या गाड्या आहेत.

अल्लु अर्जुनकडे भारतातली सर्वात महागडी वॅनिटी व्हॅन आहे. त्याने ही व्हॅन २०१९ मध्ये खरेदी केली होती. तिचे नाव Falcon ठेवले आहे. ही गाडी बाहेरुन जितकी सुंदर दिसते तितकीच ती अलिशान सुद्धा आहे. या गाडीत हाई टेक एलईडी लाइट्स लावल्या आहेत.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *