प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा आणि आपल्या अभिनयाची छाप लाखो चाहत्यांच्या मनावर उमटवणारा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार याचा बेल बॉटम हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. बेल बॉटम चे दोन पोस्टर्स या अगोदर प्रदर्शित झाले होते मात्र या पोस्टर्स मध्ये अक्षय कुमार एकटाच दिसत आहे. त्यामुळे या चित्रपटामध्ये अभिनेत्रीची भूमिका कोण साकारणार याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये होती, परंतु आज प्रदर्शित झालेल्या पोस्टर मध्ये वाणी कपूर अक्षय सोबत दिसत आहे. या पोस्टरच्या माध्यमातून प्रेक्षकांना आपल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे.मागील सिनेमात वाणी कपूरला ऋतिक रोशन सोबत पहिले गेले आहे तिने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर ही खुशखबर दिली आहे .बेल बॉटम बद्दल बोलता वाणी म्हणाली,” मी या प्रोजेक्ट साठी उत्साही आहे,लवकरात लवकर या सिनेमाचे चित्रीकरण सुरु होण्याची मी वाट बघतेय.” बेल बॉटमचे दिग्दर्शन रंजीत एम तिवारी करतील. लॉकडाउनच्या काळात चित्रपटाच्या स्क्रिप्टचे काम पूर्ण झाले आहे . चित्रपटाची कथा असीम अरोरा आणि परवेज शेख ने लिहिली आहे . हा सिनेमा 2 एप्रिल 2021 ला प्रेक्षकांच्या भेटीला येईल. दूसरीकडे या वर्षी दिवाळी मध्ये अक्षय कुमारचा “सूर्यवंशी” हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात खिलाडी कुमार सोबत कटरीना कैफ दिसेल. या चित्रपटाला रोहित शेट्टी ने दिग्दर्शित केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *