सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेकदा वेगवेगळ्या गोष्टी व्हायरल होत असतात. त्यातच एखादी साधी वाटणारी गोष्ट देखील व्हायरल होऊन ती पुढे खुप प्रसिद्धीस येते. या यादीत रानु मंडल ,डब्बु अंकल, बचपन का प्यार फेम सहदेव यांची नावे आहेत. आता या यादीत आणखी एक व्यक्तीचे नाव सहभागी झाले आहे. ते नाव म्हणजे कच्चा बादाम हे गाणे गाणारा भुबन बादायकर.

सध्या सोशल मीडियावर कच्चा बादाम हे गाणे खुप ट्रेंड मध्ये आहे. सध्या सर्वसामान्यांपासुन ते अगदी सेलिब्रेटींपर्यंत सगळेच या गाण्यांवर व्हिडीओ तयार करत आहे. हे गाणे देशातच नव्हे तर विदेशामध्ये देखील खुप फेमस झाले आहे. त्यामुळे या गाण्याचा खरा गायक असणारा शेंगदाणे विक्रेता भुबन बादायकर सध्या खुप प्रसिद्धीच्या झोतात आहे.

म्युझिक कंपनीसोबत गाणे केले रेकॉर्ड – एका मुलाखतीत भुबन बादायकरने सांगितले की कच्चा बादाम हे गाणे फेमस झाल्यावर ते मी एका म्युझिक कंपनीसोबत रेकॉर्ड केले. पण त्यासाठी त्यांना त्याचे पैसे सुद्धा मिळाले नाही. इतरवेळी पण लोक येतात आणि त्याच्यासोबत व्हिडीओ बनवुन निघुन जातात. पण त्याचा हक्क त्याला मिळत नाही. पण आता त्याचा हक्क त्याला मिळावा अशी मागणी जनतेकडुनच होत आहे.

भुबन बादायकरला म्युझिक कंपनीने दिला इतक्या लाखांचा चेक – बंगाली भाषेत कच्चा बादाम गाणे गाणारा ओरिजनल सिंगर भुबन बादायकर हा एक शेंगदाणे विक्रेता आहे. तो ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी हे गाणे गाऊन शेंगदाणे विकतो. पण या गाण्यामुळेच भुबन बादायकरचे दिवस पालाटले आहे. ज्या म्युझिक कंपनीने त्याचे गाणे रेकॉर्ड केले त्याला तीन लाखांचा चेक दिला आहे. तसेच त्याच्यासोबत एक नवे कॉण्ट्रॅक्टसुद्धा केले आहे. त्यासाठी त्याला आणखी दीड लाख रुपये सुद्धा दिले आहेत.

पश्चिम बंगालच्या पोलिसांनी केले सन्मानित – कच्चा बादाम हिट झाल्यावर भुबन बादायकर सेलिब्रिटी झाला आहे. लोक त्याच्यासोबत व्हिडीओ , फोटो काढायला गर्दी करु लागले आहेत. एवढेच नाही तर बंगाल पोलिसांनी देखील त्याचा शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान केला आहे. म्युझिक कंपनी कडुन पैसे मिळाल्यावर भुबन बादायकर ला फार आनंद झाला. मात्र भुबन ला फार कमी पैसे मिळाल्याची भावना लोकांकडुन व्यक्त केली जात आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *