स्टार प्रवाह वरील सर्वाधिक लोकप्रिय आणि सार्वधिक टीआरपी मिळवणारी मालिका म्हणजे “आई कुठे काय करते”. या मालिकेतील आई या मुख्य पात्रासहित सहाय्यक व्यक्तिरेखा साकारणारी सर्वच पात्रे आपल्याला तितकीच भुरळ गंघळतात. त्यांचं एकमेकांशी असलेलं नातं, एकमेकांवर असलेले प्रेम, प्रत्येकाला सांभाळून घेणं, अपेपणा, आपुलकी, निरागसता या सर्व गोष्टी जणू प्रत्येक मध्यमवर्गीय व्यक्तीच्या जीवनाशी सांगड घालणाऱ्या आहेत आणि याचमुळे या प्रेक्षक वर्ग आहे.

सध्या मालिकेमध्ये एकामागोमाग एक रंजक असे ट्विस्ट येत आहेत. त्यामुळे मालिकेत पुढे काय घडणार हे पाहण्यासाठी लोक फार उत्सुक झाले आहेत. चूल आणि मूल हि उक्ती तंतोतंत लागू असणारी अरुंधती आता यातुन बाहेर पडत स्वतःच्या स्वप्नांना प्राधान्य देत उंच भरारी घेऊ पाहत आहे. कायम शांत, मुकाटयाने सर्व ऐकून घेणारी , सहन करणारी अरुंधती स्वतःसाठी बोलू लागली आहे. इतकेच नव्हे गेल्या काही भागांमध्ये साडीमध्ये न दिसत अरुंधती पंजाबी ड्रेस घालताना दाखवली गेली होती. मालिकेच्या या हटके कथनकामुळे प्रेक्षक वर्ग खिळून राहिला आहे.

मालिकेत सुरू असलेल्या ट्रॅकनुसार अरुंधती आणि आशुतोष अलिबागला गाण्याच्या रेकोर्डिंगसाठी गेले असताना पार्टीच्या प्रवासात मुंबईच्या दिशेने येणार रस्ता बंद झाल्याने त्या दोघांना ही एक दिवस अलिबागला थांबावे लागले आणि यामुळे समृद्धी बंगल्यात खुप मोठं वादळ आलं होतं. अनिरुद्ध तर बोललाच पण कांचनने देखील तिच्या चारित्र्यावर संशय घेतला ,ज्यामुळे अरुंधतीला प्रचंड वाईट वाटते आणि ती घर सोडून निघून जाते.

संजनाचा अर्धा प्लान तर यशस्वी झाला असं म्हणता येईल. अरुंधती या घरात राहते हे तिला नेहमीच खटकायचंय. आता संजना अरुंधतीच्या अडचणी आणखीन वाढवण्याचा प्रयत्न करताना दिसणार आहे. अप्पांनी अरुंधतीला घर सोडून जाताना जो हिस्सा देण्याच कबूल केलेलं असतं ते संजनाला पटत नाही, म्हणून आता घराचा हिस्सा अरुंधतीकडून कसा परत घ्यायचा याबद्दल प्लान करताना संजना दिसणार आहे.

विशेष म्हणजे या प्लॅनमध्ये कांचनला देखील आपल्या बाजूने करण्याची संजना प्रयत्न करणारा असून ते प्रयत्न यशस्वी देखील होणार आहेत. कांचनाच्या सांगण्यावरून अरुंधती तिच्या नावावर असलेला हक्काचा हिस्सा ती कांचनला परत देणार आहे. संजाने तयार केलेल्या कागदपत्रांवर लिहिण्यात येते की, अरुंधती तिच्या स्वतःच्या मर्जीने तिच्या नावे असलेला अर्धा हिस्सा ती कांचनच्या नावावर करत आहे.

तितक्यात कांचन म्हणते, जे आमचं आहे तेच आम्हाला परत हवंय…. त्यावर अरुंधती म्हणते, या घरात माझी काही हक्काची माणसं आहेत, त्यांच्यावरचा माझा हक्क तुम्ही कधीच हिरावून घेऊ शकणार नाही. अरुंधतीच्या मागे एकामागोमाग एक संकटे उभी असली तरी तिची आई, तिचा भाऊ, तिचा मुलगा, सासरे, तिचे मित्र यांची तिला भक्कम साथ मिळणार आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *