सध्या बॉलिवुडमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भुमिका साकारुन अभिनेत्री दिपिका पादुकोणने टॉपचे स्थान मिळवले आहे. दिपिका २००५ मध्ये हिमेश रेशमियाचा म्यूजिक वीडियो ‘नाम है तेरा’मध्ये सर्व प्रथम काम केले होते. त्यानंतर तिने २००७ मध्ये शाहरुख खान सोबत ‘ओम शांति ओम’चित्रपटातुन बॉलिवुडमध्ये डेब्यु केला. पण तुम्हाला माहित आहे का दिपिकाला बॉलिवुडमध्ये येण्याची सर्वात पहिली ऑफर सलमान खानने दिली होती. जी दिपिकाने रिजेक्ट केली. याबाबत तिने स्वता खुलासा केला आहे.
दिपिकाने याबाबत बॉलीवुड हंगामा ला या प्रकारामागचे कारण सांगितले. दिपिकाने सांगितले कि तिचे आणि सलमानचे नाते नेहमीच चांगले होते त्याने मला बॉलिवुडमध्ये सर्वात पहिला चित्रपट ऑफर केला होता यासाठी मी त्याची नेहमीच आभारी राहिन. मी त्यावेळी मॉडेलिंग सुरु केली होती आणि माझ्या सोबत काम केलेल्या एका व्यक्तीने सलमानला माझे नाव सुचवले होते. तेव्हा त्यांनी माझ्यातली काम करण्याची धमक बघितली जी मला दिसली नव्हती.
दिपिकाने पुढे सांगितले कि तिला त्यावेळी अभिनय आणि चित्रपटांमध्ये काम करण्यात कोणताही इंट्रेस्ट नव्हता. पण दोन वर्षांनी मी ‘ओम शांति ओम’ स्विकारला कारण तोपर्यंत माझे विचार बदलले होते. त्यामुळेच मी चित्रपटासाठी होकार दिला होता.
भविष्यात ती सलमान सोबत एकना एक दिवस नक्की काम करेल असे दिपिकाने सांगितले. दिपिका आणि सलमानला एकत्र चित्रपटात पाहण्यासाठी त्यांचे चाहते खुप उत्सुक आहेत.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !