शाहरुखचा मुलगा आर्यन खान नाही बनणार अभिनेता, या क्षेत्रात नाव कमवण्यासाठी झाला आहे सज्ज, जाणून घ्या !

106

बॉलीवूडचा बादशाह म्हणून ओळख असलेला शाहरुख खान हा अनेकांचा आवडता नट आहे. शाहरुख स्क्रीनवर आला की नजर त्याच्यावरून हालणारच नाही, इतकी साधी सरळ पात्र तो साकारतो. त्याची स्टाईल, त्याचं राहणं अनेक जण फॉलो करतात. शाहरुख खान त्याचे चित्रपट, अभिनय यामुळे चर्चेत असतोच, पण त्याच्या खाजगी आयुष्यातील काही घटनांमुळे देखील तो अनेकदा चर्चेचा विषय ठरला आहे. पत्नी गौरी खान, मुलं आर्यन खान, सुहाना खान, अब्राम खान हे अनेकदा चर्चेचे विषय ठरलेले दिसतात. आर्यन खानच्या अटकेच्या विषयानंतर पुन्हा एकदा आर्यन खान चर्चेचा गहन विषय ठरला आहे.

आपल्या मोठ्या मुलाला अभिनयापेक्षा चित्रपटसृष्टीत जास्त रस असल्याचे शाहरुखने अनेकवेळा सांगितले आहे. अशा परिस्थितीत आता आर्यनने आपले स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल केली आहे. पिंकविलाच्या अहवालानुसार, तो ओटीटी प्लॅटफॉर्म किंवा फीचर फिल्मसाठी स्क्रिप्ट लिहिणार आहे. इतकंच नाही तर त्यासाठी तो ओटीटी प्लॅटफॉर्मवर एका वेब सीरिजसाठीही चर्चेत आहे. रिपोर्टनुसार, आर्यन एका चित्रपटासाठीही काम करत आहे. हा चित्रपट शाहरुख खानच्या रेड चिलीज एंटरटेनमेंटद्वारे तयार केला जाऊ शकतो.

आर्यन खान बिलाल सिद्दीकीसोबत या प्रोजेक्ट्सवर सह-लेखक म्हणून काम करत आहे. त्याच वेळी, जर आपण शाहरुख खानची मुलगी सुहाना खानबद्दल बोललो तर पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, ती देखील लवकरच चित्रपटांमध्ये प्रवेश करणार आहे.

असे सांगितले जात आहे की, सुहाना नेटफ्लिक्सवरील वेब सीरिजमधून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. ज्या वेब सीरिजमधून सुहाना पदार्पण करणार आहे तो चित्रपट निर्माती झोया अख्तर दिग्दर्शित करत आहे. ही वेब सिरीज आर्ची कॉमिक्सवर आधारित असल्याचे बोलले जात आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !