स्टार प्रवाहवरील सर्वच मालिका प्रेक्षकांच्या अगदी पसंतीस उतरल्या आहेत. स्त्री पात्राला केंद्रस्थानी ठेवत या मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत अविरत सुरु आहेत. या मालिकांपैकी प्रसिद्ध असलेली एक मालिका म्हणजे “स्वाभिमान – शोध अस्तित्वाचा”. एका महत्त्वाकांक्षी मुलीची तिच्या स्वप्नांच्या दिशेने होणारी वाटचाल आणि त्यात येणाऱ्या अडथळ्यांवर मात करत ती कशी पुढे जाते, ही या मालिकेची मध्यवर्ती कल्पना आहे.

ह्या मालिकेमध्ये देखील सध्या रंजक असा ट्विस्ट आला आहे. मालिकेतील पल्लवी आणि शांतनू एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत, परंतु दोघांनी ही एकमेकांना प्रेमाची काबुली अद्याप दिलेली नाही. तर दुसऱ्या बाजूला शांतनूचा साखरपुडा निहारिका सोबत त्याच्या घरच्यांनी ठरवला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Star Pravah (@star_pravah)


शांतनू आणि निहारिकाच्या साखरपुड्याची सध्या मालिकेमध्ये जोरदार तयारी सुरु आहे. निहारिकाने तिची जवळची मैत्रीण म्हणून साखरपुड्याच्या सर्व मदतीसाठी आणि समारंभासाठी तिने घरी पल्लवीला आणले. त्यातच एक प्रोमो सध्या आला आहे. या प्रोमोमध्ये पल्लवी आणि शांतनू साखरपुड्याची अंगठी पाहण्यासाठी ज्वेलर्सकडे जातात.

निहारिकाला येणं जमणार नसून ते दोघेच अंगठी पाहण्यासाठी जातात. शांतनू अंगठी कशी आहे विचारत ती अंगठी सरळ पल्लवीच्या बोटात घालतो आणि परफेक्ट असं म्हणतो……

शांतनू घरच्यांच्या सांगण्यावरून साखरपुड्याला तयार तर झाला आहे, पण तो पल्लवीशी साखरपुडा करणार असे त्याने ठरवले आहे. त्यामुळे मालिका आता पुढे कोणते वळण घेणार आणि पल्लवी व शांतनू एक होणार की वेगळे होणार, यावर प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *