भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीचे नाव देशाच्या सर्वात यशस्वी कर्णधारांच्या यादीत येते. विराट कोहलीच्या कॅप्टन्सी काळात देशाचे नाव क्रिकेट जगतात रोशन झाले. त्याच्या अंतर्गत अनेक महत्वपुर्ण सामने देशाने जिंकले. विराट मैदानासोबतच सोशल मीडियावर सुद्धा खुप अॅक्टिव्ह असतो.

नुकतीच त्याने एक फोटो पोस्ट केला आहे जो वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे. विराटने एक हॉलचा फोटो पोस्ट केला ज्यात त्याच्यासारखे दिसणारे अनेक जण दिसत आहे. यात त्याने खऱ्या विराट कोहलीला ओळखण्याचे चॅलेज दिले आहे.

ट्विटर वर केला फोटो पोस्ट – विराटची ही व्हायरल पोस्ट त्याने ट्विटरवर पोस्ट केली आहे. या फोटोत एका हॉल मध्ये विराट सारखे अनेकजण बसले आहे.ज्यात सगळ्यांनी एकसारखे आणइ एकाच रंगाचे कपडे घातले आहे. शिवाय प्रत्येकाने विराट सारखाच दाढीवाला लुक ठेवला आहे. क्रिकेटर्सनी या फोटो मधुन खरा विराट कोण ते शोधा असे चॅलेंज दिले आहे.

दोन लाखांहुन अधिक लाईक्स – विराटच्या या पोस्ट मध्ये १० तरुण दिसतात. त्यात काही उभे आहे तर काही बसलेले आहेत. या सगळ्यांमध्ये विराट सुद्धा आहे. पण सगळे एकाच लुक मध्ये व एकाच पोषाखात असल्यामुळे खऱ्या विराटला ओळखणे थोडे मुश्किल होत आहे. विराटच्या फॅन्सना मात्र ही पोस्ट खुप आवडली आहे.

या फोटोला २ लाखांहुन अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तर ११ हजार लोकांनी या पोस्टला रिट्विट केले आहे. या फोटोला कमेंटसुद्धा खुप येत आहे. एकाने विव्हो फोनच्या मध्ये आयफोनला शोधल्यासारखे आहे अशी मजेदार कमेंट केली आहे तर एकाने या फोटोत केएल राहुल सुद्धा असल्याचे म्हटले आहे.

अनुष्का शर्माचा पती विराट कोहली – विराट कोहलीला कोणत्याही ओळखीची गरज नाही हे आपण सर्वच जाणतो. पण विराटचा क्रिकेट विश्व सोबतच बॉलीवूडशीपण संबंध आहे. तो अभिनेत्री अनुष्का शर्माचा पती आहे. त्यांना एक मुलगी देखील आहे जिची तो खूप काळजी घेतो. विराट हा दिल्लीचा असून सुरुवातीपासूनच त्याने क्रिकेटमध्ये खूप नाव कमावले.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *