सुप्रसिद्ध संगीतकार गायक जुबिन नौटियाल लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. विशेष म्हणजे तो कबीर सिंग फेम अभिनेत्री निकीता दत्ता सोबत लग्न करणार असल्याचे म्हटले जाते. दोघांच्याही परिवाराने त्यांच्या लग्नाला परवानगी दिल्याची चर्चा सध्या होत आहे. काही दिवसांपुर्वी दोघांनी एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यावेळीच त्यांच्या रिलेशनशिपची चर्चा सर्वत्र होऊ लागली होती.

निकीताने एक फोटो शेअर करत त्या फोटोला ”मैंने अपनी आत्मा का थोड़ा सा पहाड़ों में छोड़ दिया” असे कॅप्शन दिले होते त्यावेळी जुबिन नौटियालने त्यावर कमेंट करत म्हटले की ”क्या आप यहां भी अपना दिल भूल जाते हैं”
या दोघांमधील जवळीक वाढत आहेच मात्र सोबतच त्यांच्या परिवाराने सुद्धा एकमेकांच्या परिवाराशी भेट घेतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार निकीता उत्तराखंडमध्ये जुबिन नौटियालच्या घरी गेली होती. तर जुबिन सुद्धा लग्नाच्या प्लॅनिंगसाठी निकीताच्या मुंबईतल्या घरी गेला होता. शिवाय दोघांनीही अनेकदा एकत्र रेस्ट्रॉरेंटमध्ये किंवा एअरपोर्टवर रिसिव्ह करताना पाहिले गेले आहे.

या दोघांच्या पहिली भेट ही कबीर सिंह चित्रपटाच्या सेटवर झाली होती. कबीर सिंग चित्रपटात निकीताने शाहीदच्या गर्लफ्रेंडची भुमिका साकारली होती. तर जुबीनने तुझे कितना चाहे हे गाणे गायलेले. निकीता आणि जुबीन अनेकदा एकमेकांच्या फोटोवर कमेंट करत असतात. त्यामुळे ते दोघे लवकरच एकमेकांसोबत विवाहगाठ बांधतील अशी शंका त्यांच्या चाहत्यांना आहे. मात्र या दोघांकडुन अजुन कोणतीही त्यांच्या नात्याबद्दल अधिकृत घोषणा झालेली नाही. पण त्यांचे सतत एकमेकांना भेटने सोशल मीडियावर कमेंट करणे हे त्यांच्या नात्याचा इशारा आहे असे म्हटले जाते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nikita Dutta 🦄 (@nikifying)


निकीता दत्ता ही कबीर सिंह आणि द बिग बुल साठी प्रसिद्ध आहे. कबीर सिंहमध्ये निकीताने जिया शर्मा हें पात्र साकरले होते. या चित्रपटात तिची छोटी भुमिका जरी असली तरी ती कमालीची भाव खाऊन गेली होती. त्यानंतर तिने अभिषेक बच्चनसोबत बिग बुल चित्रपटात काम केले. तर जुबीनने पण बलिवुडमध्ये अनेक प्रसिद्ध गाणी गायली आहेत. त्यात इश्क दा मारा, बंदेया, समंदर, काबिल हूं मैं, बूंद-बूंद, आवारगी, फिर मुलाकात, बारिश, दिल जानिए, तारों के शहर, रातां लंबियां, कमली, आंख उठती मोहब्बत सारख्या गाण्यांचा समावेश होतो.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *