टीव्हीवरील मालिकांमधून अनेक नवोदित चेहरे आपल्याला दिसत असतात, आपले मनोरंजन करत असतात. त्या नवोदित चेहऱ्यांपैकी काही चेहरे हळूहळू आपल्या अभिनयाने त्यांची भुरळ पाडतात आणि लोकप्रिय होतात. अशाच एका मालिकेमधील चेहरा जो लोकप्रिय झाला त्या व्यक्तीविषयी आपण आज बोलणार आहोत.

झी मराठीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतील अंजली ही भूमिका साकारलेली अभिनेत्री अक्षया देवधर घराघरात पोहोचली. अंजलीपेक्षा ‘पाठकबाई’ ही तिला मिळालेली खरी ओळख. तिची ही भूमिका प्रेक्षकांच्या फारच पसंतीस उतरली. अभिनेत्री अक्षया देवधरचा मोठा चाहता वर्ग देखील निर्माण झाला आहे. त्या मालिकेमधील तिचा पेहराव म्हणजेच ती घालत असलेले ड्रेस, साडी याचे अक्षरशः ट्रेंड झाले होते. बाजारपेठांमध्ये त्या पाठक बाई घालत असलेल्या कपड्यांना मागणी होती.

मुळची पुण्याची असलेली अक्षयाने पुण्यातील अहिल्यादेवी हायस्कूल व बीएमसीसी कॉलेज येथे शिक्षण पूर्ण केले. तिने २०१२ मध्ये महाराष्ट्र टाइम्सचा ‘मटा श्रावण क्वीन‘ पुरस्कार जिंकला. मालिकेत कामं करण्यापूर्वी तिने अमेय वाघ सोबत “आयटम” या नाटकातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.

सध्या ती झी मराठीवरील “हे तर काहीच नाही” या कार्यक्रमात निवेदिका आहे. अक्षया देवधर हिचे ग्लॅमरस फोटो सध्या चर्चेत आहेत. आधी मालिकेमुळे व्यग्र असल्यामुळे आता स्वतःला वेळ देतेय, सोशल मीडिया वापरून पाहतेय आणि सगळ्या प्रकारच्या भूमिका साकारण्यासाठी तयारी करतेय, असं सांगत अक्षयानं विविध विषयांवर तिची मतं मांडली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshaya Mahesh (@akshayaddr)


इंस्टाग्रामवरील एका फिल्टरमुळे अक्षय देवधर सध्या चर्चेत आली आहे. या फिल्टरमधील व्हिडीओ पाहून अक्षयाचे चाहते नाराज झाले आहेत. अक्षयाचे लग्न कधीच होणार नाही असं त्यात आहे. व्हिडीओ चांगलाच मजेशीर आहे. इन्स्टाग्रामवर टाईमपास सुरू असताना अक्षयाला एक फिल्टर मिळाला. तुमचं लग्न कधी होणार? याचं उत्तर हा फिल्टर देतो.

अक्षयालाही हा फिल्टर वापरण्याचा मोह अनावर झाला. तिनेही तो फिल्टर ट्राय केला आणि त्याने तुमचं लग्न कधीच होणार नाही, असं उत्तर तिला मिळालं. फिल्टरचा रिझल्ट बघत काय करू असं अक्षयाला झालं. तिचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय. कलाकार तसेच चाहत्यांनी कमेंट्सही केल्या आहेत. अक्षया सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह असते. ती अनेक व्हिडीओ व ग्लॅमरस फोटो शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *