केस ही स्त्रीयांसाठी एखाद्या मौल्यवान दागिन्यांप्रमाणे असतात. त्यामुळे त्यांची निगा राखण्यात त्या कोणतीही कसर मागे सोडत नाही. लांबसडक ,जाड, चमकदार, मऊ आणि सरळ केस हे प्रत्येक स्त्रीला हवेहवेसे वाटतात. केस सरळ असावेत यासाठी तर नाना विविध प्रकार केले जातात. ब्युटी पार्लरमध्ये जाऊन केस सरळ करण्यासाठी भरपूर पैसे खर्च केले जातात.

वेगवेगळ्या महागड्या क्रिम्सचा केसांवर भडीमार केला जातो. पण या केमिकल युक्त प्रोडक्टस्मुळे केस काही काळ सरळ आणि सुंदर दिसतात, परंतु काही काळानंतर केस पुन्हा पूर्वीसारखे मुळ रुपात येतात. केसांमध्ये रासायनिक उत्पादनांचा वारंवार वापर केल्याने केसांची नैसर्गिक चमक आणि गुणवत्ता दोन्ही बिघडते.

केस स्ट्रेट करण्यासाठी हॉट स्टाइलिंग टूल्सचा वापर केल्याने केसांमधील ओलावा कमी होतो आणि केस तुटू लागतात. ब्लो-ड्रायर्स, सिरॅमिक स्ट्रेटनर आणि हॉट कर्लिंग आयरनमुळे केसांचे खूप नुकसान होते. त्यामुळे या सर्व गोष्टी न करता केस सुंदर आणि सरळ कसे करायचे, हा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच आला असेल. आज आम्ही तुम्हाला तुमच्या घरात असलेल्या गोष्टींनी केसांना सुंदर, मुलायम, चमकदार आणि सरळ कसे बनवायचे यासाठी उपाय सांगणार आहोत.

या नैसर्गिक पद्धतींमुळे तुमचे केस मुलायम रेशमी आणि लांब बनतील शिवाय त्यामुळे केसांवर कोणतेही दुष्परिणाम होणार नाहीत. इतकेच नाही तर या उपायांमुळे कुरळे केसही सहज सरळ होतात. मात्र त्याआधी, केसांची योग्य देखभाल करण्याच्या पद्धती जाणून घेणे फार महत्वाचे आहे. कारण अनेक वेळा आपल्या वाईट सवयींमुळे केस कमकुवत बनवतो.
ओले केस नेहमी नैसर्गिक पद्धतीने वाळवावे ,हेअर ड्रायरचा नियमित वापर केल्यास केस कमकुवत होतात आणि त्यांची नैसर्गिक चमक निघुन जाते.

केस सरळ करण्यासाठी हेअर जेल, क्रीम किंवा सौंदर्य उत्पादन असलेले कोणतेही रसायन वापरू नये. केस रोज किंवा सतत इस्त्री किंवा इतर कोणत्याही मशीनने सरळ करू नयेत. असे केल्यास तुमचे केस राठ आणि निर्जीव होतील आणि गळू लागतील. केसांवर साधनांचा वापर टाळावा.

घरच्या घरी नैसर्गिक पद्धतीने केस सरळ आणि चमकदार करण्यासाठी उपाय – १. केस सरळ करण्यासाठी ऑलिव्ह ऑईल अत्यंत फायदेशीर असते. यासाठी ऑलिव्हमध्ये एक अंडे फोडून चांगले मिसळून मिश्रण तयार करा आणि हलका मसाज करून केसांना लावा. एक तासानंतर, डोके स्वच्छ पाण्याने धुवा. असे २ ते ३ वेळा केल्यानंतरच फरक दिसून येईल.
२. एक कप दुधात २ चमचे मध मिसळून केसांना लावा आणि दोन तास तसंच राहू द्या, नंतर स्वच्छ पाण्याने केस धुवा. त्यामुळे केस मऊ आणि सरळ होतील.

३. केस सरळ करण्यासाठी एरंडेल तेल कोमट करून केसांना मसाज करा आणि गरम पाण्यात भिजवलेला टॉवेल घेऊन डोक्याला चांगला गुंडाळा. त्यानंतर ३० ते ४५ मिनिटांनी डोके धुवा. ४. तुम्हाला माहित आहे का जेवणात रोजच्या वापरात येणाऱ्या कोथिंबीरच्या मदतीने केसही सरळ आणि काळे करता येतात. यासाठी कोथिंबीर मिक्सरमध्ये बारीक करून त्याचा रस काढा आणि केसांना लावा, केस सरळ होऊ लागतात.

५. मुलतानी माती, तांदळाचे पीठ, अंडी आणि दही एकत्र करून त्याची पेस्ट बनवून केसांना लावली जाते आणि एक तासानंतर डोके धुतल्यावर केस मऊ आणि सरळ होतात. हा उपाय आठवड्यातून एकदा करावा . ६. कोरफडीचा गर केस सरळ करण्यासाठी अत्यंत फायदेशीर असतो. यासाठी कोणत्याही केसांच्या तेलात कोरफडीचा गर समान प्रमाणात मिसळा आणि ते हलके गरम करा आणि नंतर केसांना लावा. हे केसांसाठी नैसर्गिक कंडिशनर म्हणून काम करते.

७. दोन चमचे मध, ऑलिव्ह ऑईल, २ पिकलेली केळी आणि दही घेऊन चांगले मिक्स करून तयार केलेली पेस्ट केसांना लावा आणि अर्ध्या तासानंतर केस धुवा. यामुळे केस सरळ, मऊ आणि रेशमी बनतात. ८.रोज रात्री झोपण्यापूर्वी केसांना हलके ओले करून केसांच्या २ वेण्या बांधाव्यात . यामुळे काही दिवसात केस सरळ होऊ लागतील.

९. स्प्रे बॉटलमध्ये दूध आणि पाणी समान प्रमाणात घेऊन केसांवर आणि कंगव्यावर फवारणी करा. केस कोरडे झाल्यावर ही क्रिया पुन्हा करा आणि साधारण अर्ध्या तासानंतर डोके धुवा. १०. नारळाच्या दुधात थोडासा लिंबाचा रस मिसळा आणि केसांना लावा आणि 10 ते 15 मिनिटांनी केस धुवा. यामुळे केस नैसर्गिकरित्या मजबूत आणि सरळ होतात.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

अस्वीकरण  दिलेल्या टिप्स आणि सूचना सामान्य माहितीसाठी आहेत. त्यांना कोणत्याही डॉक्टर किंवा वैद्यकीय शाश्त्राचा सल्ला असा समजू नका. आजारपण किंवा संसर्गाची लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. वरील माहिती इंटरनेट वरील माहितीचा आधार घेत बनवलेली आहे. दिलेल्या माहितीशी बॉलीरिपोर्ट सहमत असेलच असे नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *