नुकताच स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळा २०२२ पार पडला. या सोहळ्यात बऱ्याच मालिकांना वेगवेगळ्या पुरस्कारांनी गौरवण्यात आले. या सोहळ्यानंतर स्टार प्रवाह वर एका नव्या मालिकेचा प्रोमो येऊ लागला आहे. विशेष म्हणजे या नव्या मालिकेची वेळ रात्री ९ ची दिली आहे. त्यामुळे रात्री ९ वाजता स्टार प्रवाहवरील मुलगी झाली हो ही मालिका बंद होणार अशा चर्चा रंगु लागल्या आहेत.

गेल्या काही महिन्यांपुर्वी या मालिकेतील स्टार कास्टच्या अंतर्गत वादांमुळे ही मालिका चर्चेत आलेली. मालिकेतील अत्यंत महत्वाचे पात्र म्हणजे माऊच्या वडिलांची भुमिका साकारणाऱ्या अभिनेता किरण माने यांना राजकिय वादावर टिप्पणी दिल्यामुळे मालिकेतून कोणतीही पुर्व कल्पना न देता तडकाफडकी काढुन टाकले होते. शिवाय त्यांच्या सहकलाकारांनी देखील त्यांच्यावर गैर वर्तवणुकीचे गंभीर आरोप केले होते. पण आता पुन्हा एकदा ही मालिका बंद होणार असल्याचे समजताच किरण माने यांची एक वादग्रस्त फेसबुक पोस्ट चर्चेत आली आहे. या पोस्ट मधुन त्यांनी त्यांचे मालिका बंद होण्या पाठीचे स्वताचे मत मांडले आहे.

किरण माने यांनी फेसबुक पोस्ट करत म्हटलं आहे की, ”’प्रेक्षक लै लै लै नादखुळा असत्यात भावांनो… मला काल वाढदिवसाची सगळ्यात मोठी गिफ्ट कुनी दिली आसंल, तर ती प्रेक्षकांनी ! जी गोष्ट भलेभले करू शकले न्हाईत, ती त्यांनी एका रट्ट्यात केली !! एका माजोरड्या प्राॅडक्शन हाऊसचा नक्षाच उतरवला. कटकारस्थान रचून मला बाजूला केल्यानंतर त्या सिरीयलचा टीआरपी असा काय घसरला की चॅनलनं ती अख्खी सिरीयलच ‘प्राईम टाईम’मधून लाथ घालून हाकलली !!!
जी सिरीयल शहरी आणि ग्रामीण विभागात मिळून सलग दीड वर्ष बहुतांश एक नंबरवर आनि बर्‍याचदा पहिल्या तीन नंबरमध्ये असायची. ती तीन म्हैन्यात रसातळाला गेली. आता मे महिन्यापासून ती सिरीयल, अतिशय महत्त्वाच्या समजल्या जानार्‍या ‘स्पेशल प्राईम टाईम’ला दिसनार नाय. फक्त तीन म्हैन्यात हे घडलं. ह्याला म्हन्त्यात ‘पोएटिक जस्टिस’.

ही गोष्ट साधी नाय भावांनो. सर्वसामान्य जन्तेनं मनावर घेतलं तर काय होऊ शकतं याचं लै लै लै खतरनाक उदाहरन हाय. ‘खरा न्याय’ सर्वसामान्य जन्तेच्या दरबारात असतो. लोकप्रतिनिधी निवडतानाबी जन्तेनं अशीच ताकद दाखवली तर भल्याभल्यांना धोबीपछाड बसू शकते, हे इतिहासानं दाखवून दिलंय. “ये पब्लीक है ये सब जानती है” असं त्यो राजेश खन्ना डोळं मिचकावत म्हनत नाचायचा, ते काय खोटं न्हाय.

..कुनाला वाटत आसंल आता किरन माने नाचत आसंल, खुश झाला आसंल. नाय भावांनो. लढाई संपलेली नाय. मी कायदेशीर मार्गानं लढून तो न्यायबी मिळवनारच हाय. सुट्टी देनार नाय या भंगारांना. पन काही ‘बिकाऊ’ कलाकारांनी माझ्यावर जे आरोप केले, त्या सगळ्यांना प्रेक्षकांनीच सनसनीत, कचकटून थोबाडीत देऊन उत्तर दिलं याचं समाधान मात्र नक्की हाय.

कुनीतरी सांगीतलं की ती सिरीयल आता दुपारी दाखवनारेत. हे तर लै बेक्कार भावांनो. एखाद्या यशस्वी पोलीस इन्स्पेक्टरचं अचानक एक दिवस डिमोशन करून त्याला ट्रॅफिक हवालदारची ड्यूटी द्यावी तसं हाय हे ! यातही समाधान हे की जे बिचारे हातावर पोट असनारे असत्यात ते स्पाॅटबाॅय पासून मेकअपमन हेअरड्रेसर पर्यन्त त्यांचं पोट सुरू र्‍हानार. बाकी माजोरडे कलाकार कर्मानं मरनार. धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय अशी गत हुनार. जिथं फुलं वेचली तिथं गवर्‍या वेचायची वेळ येनार. असो. माझ्यावर कटकारस्थान रचून फायदा कुनाचा झाला आनि नुकसान कुनाचं झालं यावर एक चिंतन शिबीर घ्यावं त्यांनी.

बाकी वाढदिवस लैच भारी गेला. तुमच्या शुभेच्छांच्या वर्षावानं भारावून गेलो. या वर्षीचा वाढदिवस ‘स्पेशल’ बनवला तुमी. एकेक पोस्ट वाचताना आनंदाश्रू येत होते. लब्यू लब्यू लब्यू लैच मित्रमैतरनींनो ! तुमाला अभिमान वाटंल आसंच काम माझ्या हातनं होत र्‍हाईल याची खात्री देतो. मनापास्नं आभार.

सध्या किरण मानेंची ही फेसबुक पोस्ट फारच चर्चेत आहे. मुलगी झाली हो या मालिकेबदली आता तुझेच मी गीत गात आहे ही नवी कोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ही मालिका म्हणजे स्टार प्लसवर कुल्फीकुमार बाजरेवाला या मालिकेचा मराठी रिमेक असणार आहे. विशेष म्हणजे या मालिकेद्वारे अभिनेत्री उर्मिला कोठारे छोट्या पडद्यावर १२ वर्षांनी पुर्नआगमन करणार आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *