रंग माझा वेगळा हा मालिका त्याच्यात येणाऱ्या वेगवेगळ्या वळणांमुळे नेहमीच चर्चेत असते. नुकताच या मालिकेला स्टार प्रवाहाची सर्वोत्कृष्ठ मालिका म्हणुन पुरस्कार मिळाला. गेले कित्येक दिवस दिपा आणि कार्तिकच्या नात्यात दुरावा आले आहे . पण आता ते एकत्र कधी येतील याची प्रेक्षक चातकाप्रमाणे वाट पाहत आहे. सध्या या मालिकेत नवे वळण आलेले दिसुन येते.
नवऱ्या पासुन कित्येक वर्षे दुर राहिलेली दिपा तिच्या मुलीचे एकटीने संगोपन करते. शिवण काम, लोकांना डबे देण्याचा व्यवसाय या सारखी छोटी मोठी काम करुन ती त्यांचा उदरनिर्वाह करत असते. आता दिपाकडे एक वेगळी संधी चालुन आली आहे. त्यासाठी दिपा आता मॉडेलच्या रुपात पाहयला मिळेल.
मालिकेत व्हिलन दाखवण्यात आलेली श्वेता ही मॉडेल असते हे आपल्याला ठाऊकच आहे. त्यामुळे आता इनामदारांनी लॉन्च केलेल्या ब्युटी प्रोडक्टसाठी पुन्हा श्वेताच मॉडेल होईल अशी तिची इच्छा होती. मात्र तसे घडले नाही. इनामदारांच्या बिझनेस पार्टनरने श्वेताला या जाहिरातीत काम करण्यास मनाई केली आहे. नव्या कल्पनेसह नव प्रोडक्ट लॉन्च करण्याची त्यांची इच्छा आहे या साठी नवा चेहरा म्हणुन त्यांनी दिपाला घेण्याचा निर्णय घेतला आहे.
नुकताच या संबधीचा प्रोमो लॉन्च करण्यात आला. प्रो़डक्टसाठीच्या जाहिरातीमध्ये काम करण्यासाठी दिपा आणि दिपिका सुंदर तयार झालेल्या आहेत. दिपाला साडी नेसुन तयार झालेल पाहुन पुन्हा एकदा कार्तिकची विकेट पडते. व त्याला दिपावरच्या प्रेमाची हळुहळु जाणीव होऊ लागते. या जाहिरातीच्या निमित्ताने का होईना पण दिपा कार्तिक एकत्र येत असल्याचे पाहुन प्रेक्षक खुप खुष आहेत.
दिपा आणि कार्तिक सोबतच कार्तिकी आणि दिपिका या चिमुकल्या सुद्धा प्रेक्षकांना आवडत आहेत. या दोघींही सध्या त्यांच्या एकत्र कुटुंबाची स्वप्ने पाहत आहेत. एकीकडे आई आहे तर दुसरीकडे डॅडा. या दोघांना एकत्र आणले तर त्यांची फॅमिली पुर्ण होईल अशी स्वप्ने त्या रंगवत आाहेत व त्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र या दोघींही त्याच्या आई वडिलांच्या सत्यापासुन अजुनही अलिप्त आहेत. त्यांच्यासमोर जेव्हा हे सत्य येईल तेव्हा त्यांची रिअॅक्शन काय असेल हे पाहणे नक्कीच इंटरेस्टींग ठरेल.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !