बॉलीवूडमधील काही आदर्श जोडपी आहेत, ज्यांच्या नात्याचं अनेकदा उदाहरणं दिलं जातं. त्यातली एक जोडपं म्हणजे अजय देवगण आणि काजोल. दोघे ही लग्नानंतर अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत आणि आपल्या कुटुंबासाठी देखील तितकाच वेळ देताना दिसतात. एकेमकांना समजून घेत ते दोघे ही कामासोबतच आपल्या वैवाहिक, कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत असतात. अनेक जण या जोडप्याला आपले आदर्श मानतात, असं म्हणणं वावगं ठरणारं नाही.

अजय देवगण आणि काजोल यांच्या लग्नाला 23 वर्षे झाली आहेत, पण त्यांच्या नात्यात आज ही तितकंच प्रेम असलेलं आपल्याला दिसून येत. या दोघांनीही एकमेकांना प्रत्येक परिस्थितीत साथ दिली आहे. काजोलने अजयसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला होता जेव्हा ती तिच्या करिअरच्या शिखरावर होती आणि त्यानंतर तिने आपल्या कुटुंबाला प्रथम प्राधान्य दिले. तेव्हापासून काजोल-अजयचे नाते किती घट्ट झाले आहे, यावरून त्यांचे बाँडिंग आणि त्यांच्यातील हितगुज यातून चांगल्या प्रकारे दिसून येतात.

दोघे एकमेकांपासून खूप वेगळे आहेत, पण तरीही एक आहेत, याचे कारण एखादं नात अधिक चांगल्या प्रकारे समजून घेणे आहे. अलीकडेच अजयने खुलासा केला की त्याने काजोलशी लग्न का केले आणि त्याने तिच्यासोबतचे नाते कसे हाताळले. त्याच्या बोलण्यातून अनेक जोडप्यांना काही टिप्स नक्कीच घेता येतील.

अलीकडेच एका टॉक शोदरम्यान अजयला विचारण्यात आले की, त्याने काजोलशी लग्न करण्याचा निर्णय का घेतला? तर प्रत्युत्तरात अभिनेता म्हणाला, ‘खर सांगू, मला माहित नाही.. आम्ही भेटलो आणि नंतर आमचं एकमेकांशी छान जुळू लागलं. प्रपोज न करता आम्ही एकमेकांकडे एखादं नातं असल्यासारखं बघू लागलो होतो आणि मनात पक्के केले की आपण लग्न करणारच. आमचे विचार खूपच जुळतात. आम्ही दोघे एक सारखेचं मॉडेल्स आहोत, त्यामुळे सर्व काही एकाच प्रवाहात जुळत गेलं.

अजयने काजोलसोबतच्या नात्याबद्दल जे सांगितले त्यावरून आपल्याला कळतं की, केवळ प्रेमाचे तीन शब्द बोलून नाते अविरत चालू राहत नाही, तर समजून घेण्याने आणि विश्वासाने पुढे जात असते. जेव्हा तुमची तुमच्या जोडीदारासोबत चांगली अनुकूलता असते, तेव्हा अनेक वेळा तुम्ही न बोलताही एकमेकांच्या भावना समजून घेता येतात. अशा प्रकारे नाते घट्ट होते.

प्रेम आणि विश्वास असूनदेखील काजोल आणि अजयच्या नात्यात अनेक चढउतार आले, पण दोघांनीही समजूतदारपणाने ते हाताळले. अजयला जेव्हा विचारण्यात आले की, त्याचे लग्न कशावर टिकते? तर अभिनेता म्हणाला, प्रत्येक लग्नात चढ-उतार असतात, आपल्याला आपले मतभेद हाताळावे लागतात. कोणत्याही दोन व्यक्तींचे मन सारखे असू शकत नाही, मग आम्ही त्यावर चर्चा करू लागलो आणि अशा प्रकारे आलेल्या अडचणीतून मार्ग निघू लागले.

अजयच्या बोलण्यातून हे स्पष्ट होते की, जेव्हाही त्याच्यात आणि काजोलमध्ये वाद होतात तेव्हा ते दोघेही एकमेकांशी संवाद साधून त्यावर मार्ग काढतात. अशा प्रकारे ते दोघेही चांगल्याप्रकारे एकमेकांना हाताळू शकतात. नात्यात चढ-उतार येत असताना जोडीदाराशी भांडण्याऐवजी एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि खंबीरपणे उभे राहा, हेही तुम्ही या अभिनेत्याच्या मुद्द्यावरून शिकू शकता.

अजयने या चर्चेत यशस्वी वैवाहिक जीवनासाठी काही टिप्सही दिल्या आणि सांगितले की, नातेसंबंधात तुम्हाला समोरच्या व्यक्तीचा दृष्टिकोनही समजून घ्यावा लागतो. तो म्हणाला, ‘कोणत्याही जोडीदाराने त्याचा अहंकार पाळू नये आणि तुमची चूक असेल तर माफी मागून पुढे जा. जर तुम्ही तुमचा अहंकार घेऊन बसलात तर तुमचे नाते पुढे तसंच टिकू शकणार नाही.

नात्यात साधा स्वभाव खूप महत्त्वाचा असतो. जर तुम्ही प्रत्येक गोष्टीत तुमचा अहंकार आणलात तर तुमच्या जोडीदारासोबत तणाव वाढू लागतो. भांडणाच्या वेळी, छुम असल्यास सॉरी बोलून आपण किती लवकर वाद मिटवतो याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. तुमच्या जोडीदारामध्ये बदल न करता नात्यामध्ये एक सहजता यामुळे नाते निरोगी राहण्यास मदत होते.
अजयने सांगितले की ते आणि काजोल असे जोडपे कधीच नव्हते, जे समोरून खूप प्रेम दाखवतात. अभिनेता म्हणाला, ‘मी खूप बोलका आणि दिखाऊ माणूस आहे, पण मला लोकांची काळजी आहे. माझ्या आवडत्या लोकांसाठी मी ते वेगळ्या पद्धतीने दर्शवतो. जेव्हा लग्नाचा प्रश्न येतो, तेव्हा प्रेमाचे रूपांतर हे भागीदारी, जबाबदारी आणि काळजी यांमध्ये होते. मी ते प्रेमापेक्षा मजबूत मानतो, कारण जिथे फक्त प्रेम असते तिथे ते जास्त काळ टिकत नाही.’

वैवाहिक जीवनात केवळ प्रेमाच्या जोरावर तुम्ही तुमचे नाते पुढे नेऊ शकत नाही. जोडीदाराची काळजी घेणे, त्याच्यावर विश्वास ठेवणे, त्याची जबाबदारी घेणे, कुटुंबाची काळजी घेणे अशा अनेक गोष्टींचा त्यात समावेश असतो. हे आवश्यक नाही की दररोज जोडप्यांमध्ये प्रेमपूर्ण हितगुज झालं पाहिजे, परंतु आपला सिरीयसनेस या गोष्टी मजबूत बनवत असतो. तुम्ही तुमच्या जोडीदाराप्रती किती जागरूक आहात आणि तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या किती चांगल्या प्रकारे समजून घेता, यावरून आपले नाते खूप काळासाठी टिकण्यास मदत होऊ शकते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *