बॉक्स ऑफिस रेकॉर्डब्रेक कामे करणारा KGF: chapter 2 कन्नडमध्ये शूट केला गेला आहे आणि हिंदी, तमिळ, तेलगू आणि मल्याळम सारख्या भाषांमध्ये डब केला गेला आहे. या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनला बॉक्स ऑफिसवर उत्तम प्रतिसाद मिळत आहे आणि या चित्रपटाने यापूर्वीच ३०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. जेव्हा एखादा चित्रपट डब केला जातो तेव्हा मुख्य अभिनेत्याचा आवाज खूप महत्त्वाचा असतो, त्यामुळे अर्थातच, निर्माते अशा व्यक्तीच्या आवाजास प्राधान्य देतात जो अभिनेता आणि व्यक्तिरेखेला पूर्णपणे अनुरूप असेल. सचिन गोळे, जे ज्येष्ठ डबिंग कलाकार आहेत, त्यांनी KGF 1 आणि 2 मध्ये यशसाठी डबिंग केले आहे.
झी मराठीवरील मालिका” माझी तुझी रेशीमगाठ” फेम सुप्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदे याला त्याच्या अभिनय कौशल्यामुळे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. सोबतच त्याच्या डबिंग कौशल्याचे देखील कौतुक होताना आपल्याला दिसत आहे. बॉक्स ऑफिसवर जबरदस्त गाजलेला दाक्षिणात्य चित्रपट “पुष्पा” मधील अभिनेता अल्लू अर्जुनला अभिनेता श्रेयसने आपला आवाज दिला होता. श्रेयसच्या इंस्टाग्रामवरील लाईव्ह चॅटमध्ये एका चाहत्याने प्रश्न विचारला कि, ‘पुष्पांच्या प्रचंड यशानंतर KGF Chapter 2 साठी तू डबिंग का केले नाहीस? या चित्रपटासाठी तू डबिंग करायला हवं होतंस….’
चाहत्यांच्या या प्रश्नच उत्तर देत श्रेयस म्हणाला, “मला असं वाटतं की ज्याने डबिंग केलं, ते नक्कीच अप्रतिम असेल. मी अजून चित्रपट पाहिला नाही पण मला खात्री आहे की ज्या कलाकाराने चित्रपटात काम केलं आहे, त्याने जबरदस्त काम केलं असेल. सर्व कलाकार ग्रेट आहेत.’
KGF Chapter 2 मध्ये यशला आवाज देणारा सचिन गोळे सर्वश्रुत नाही आहे. डबिंग क्षेत्रात गेली १४ वर्षे सचिन गोळे कार्यरत आहे. ‘केजीएफ 2 मध्ये यशला आवाज देणारा सचिन गोळे फारच क्वचित लोकांना माहित असेल. २००८ मध्ये त्याने करिअरची सुरुवात केली. “मुंबईत मी अभिनेता होण्यासाठी आलो होतो, माझ्या कुटुंबीयांनीही माझी खूप साथ दिली.
मात्र मुंबईत आल्यानंतर माझा खरा संघर्ष सुरू झाला. मला काम मिळत नव्हते, राहायला पैसे नव्हते अशातच माझा मित्र अनिल म्हात्रे याने माझी ओळख डबिंग विश्वाशी करून दिली. त्यांच्यासोबत मिळून मी नाटकासाठी काम करायचो. हळूहळू मला डबिंग इंडस्ट्रीतील बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. यादरम्यान मी बँकेतही नोकरी करत होतो. होम लोनच्या कामासाठी फिल्डवर जावे लागत होतं. मात्र मी फक्त हजेरी लावून साऊंड स्टुडिओमध्ये येऊन बसायचो” असं सचिनने अमर उजाला या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
View this post on Instagram
“>
श्रेयसचा व्हिडीओ – सचिन गोळेनं यशच्या आधीच्या चित्रपटांसाठीही हिंदी डबिंग केलं आहे. त्यामुळे केजीएफ 2 हा टर्निंग पॉईंट नसला तरी करिअरमधील महत्त्वपूर्ण टप्पा असल्याची भावना त्याने व्यक्त केली. केजीएफ 2ची इतरही डबिंग आर्टिस्ट्सचे ऑडिशन्स घेण्यात आले होते. मात्र यशला सचिनचा आवाज खूप आवडला. केजीएफ 2 मुळे संघर्षाचा 14 वर्षांचा वनवास संपल्याचं सचिन गोळेनं या मुलाखतीत म्हटलं.