इंडस्ट्रीतील स्टारकिडस् हे त्यांच्या आईवडिलांप्रमाणेच सोशल मीडियावर राज्य करतात. या यादीत अभिनेत्री करीना कपुर खान व सैफअली खानचा लेक तैमुरचे नाव टॉपला येते. तैमुर साधा घरातुन शाळेत किंवा खेळायला जायला जरी बाहेर पडला तरी त्याची बातमी होते. नुकतेच या ५ वर्षा्ंच्या तैमुरने असे काही केले ज्यामुळे त्याचे आईवडिल त्याच्यावर फारच खुष झालेत.

तैमुरला ताइक्वांडोमध्ये मिळाला येलो बेल्ट – तैमुर भलेही ६ वर्षांचा असला तरी ही तो आतापासुनच वेगवेगळ्या अॅक्टीव्हीटीज मध्ये बिझी असतो. कधी तो पैटींग करत असतो तर कधी कुकींग. आता तैमुर ताइक्वांडो पण करतो हे समोर आले आहे. मिळालेल्या माहिती नुसार तैमुरला नुकताच ताइक्वांडो मध्ये येलो बेल्ट मिळाला आहे. या खास क्षणी त्याचे आईवडिल दोघेही त्याच्या ट्रेनिंग सेंटर वर उपस्थित होते. तैमुर ने ताइक्वांडो चा ड्रेस घातला होता. तैमुरसोबत करीना देखील सर्वांच्या नजरा स्वतावर खिळवत होती.

ट्रेनिंग सेंटरमध्ये करीनाने लाईट ब्लु जिन्स आणि त्यावर डार्क ब्लु शर्ट घातलेला. तिचा हा लुक तिने ब्लॅक सन ग्लासेस आणि स्टाईलिश बेली द्वारे पुर्ण केला. ती फारच सुंदर दिसत होती. करीनासोबत सैफसुद्धा स्टाईलिश अंदाजात दिसला पण यादरम्यान करीनाचा छोटा मुलगा जेह कुठेच दिसला नाही.

एका दिवसापुर्वी मदर्स डे चे अवचित्य साधुन करीनाने तैमुर आणि जेहसोबतचा एक खास फोटो शेअर केला होता. ती या दोघांसोबत पुलमध्ये मजा करताना दिसत होती.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *