बॉलिवुडमध्ये कलाकारांचे वय कितीही वाढले तरीही ते सदैव चिरतरुणच दिसतात असे कदाचित अनेक वरदानच लाभले आहे. त्या कलाकरांपैकीच एक म्हणजे अभिनेता सुनील शेट्टी. पण समजा जर सुनील शेट्टीला कोणी गुटखा किंग म्हटले तर…. पण प्रत्यक्षात असे झाले आहे. सोशल मीडियार एका युजरने चुकुन सुनील शेट्टीला गुटखा किंग म्हटले. याच अभिनेत्याला राग आला व त्याने त्या युजरला खडे बोल सुनावले. त्यामुळे सुनील शेट्टीची माफी मागण्या वाचुन गत्यंतर नव्हते.

काय आहे प्रकरण – सोशल मीडियावर एका युजरने बॉलिवु़डच्या तीन सुपरस्टारची विमल पान मसालाची जाहिरात शेअर केली. या जाहिरातीत अक्षय कुमार, अजय देवगन आणि शाहरुख खान दिसत होते. काही दिवसांपुर्वीच या जाहिरातींमुळे या तिघांनाही ट्रोल करण्यात आले होते. हायवेवर लागलेल्या या जाहिरातीचे होर्डींग एका युजररने शेअर केले व लिहिले की या जाहिरातीचे इतके होर्डींग या हायवेवर पाहिलेत की आता खरचं गुटखा खायचे मन करत आहे.

तर या पोस्टवर दुसऱ्या एका युजरने रागात कमेंट केली की या तीनही स्टार्सना भारताचे गुटखा किंग म्हणुन घोषित करा. व त्याने ही पोस्ट शाहरुख खान, अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीला टॅग केली. या युजरने अजर देवगण ऐवजी चुकुन सुनील शेट्टीला टॅग केले.

त्याने पुढे लिहीले की, Hey #GutkaKingsofIndia @iamsrk @akshaykumar @SunielVShetty तुमच्या मुलांना लाज वाटली पाहिजे. तुम्ही लोक देशाला चुकीच्या दिशेला घेऊन जाता. मुर्खांनो भारताला कॅन्सरवाला देश बनवु नका. युजरच्या अशा टव्टिला सुनील शेट्टीने लगेच रिअॅक्ट केले. त्यावर रिप्लाय देत सुनीलने म्हटले की, भावा, तु आधी तुझा चश्मा व्यवस्थित कर. युजरने सुनील शेट्टीची मागितली माफी.

सुनीलची ती कमेंट वाचुन युजरला त्याची चुक समजली. त्याने लगेच त्याबदली त्याची माफी मागितली. व म्हटले की सॉरी हे चुकुन झाल. मला तुम्हाला दुखी करायचे नव्हते. खुप सारे प्रेम.. ते मला अजय देवगणला टॅग करायचे होते. पण मी तुमचा खुप मोठा चाहता असल्यामुळे टॅगमध्ये तुमचे नाव नेहमीच वरती असते.

युजरने आता त्याची माफी तर मागितली पण त्याला माफ करावे की नाही हे पुर्णपणे सुनील शेट्टीवर अवलंबुन आहे. पण एक मात्र आहे चुकीच्या टॅग मुळे तंबाखु ब्रॅण्डला पुन्हा एकदा चर्चेत आणले आहे. सुनील शेट्टीला त्याच्या क्लिन पर्सनालिटीमुळे ओळखले जाते. तो कधीच अशा जाहिरातींना पाठिंबा देत नाही.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *