गर्लफ्रेंडला रात्री भेटायला यायचा, गावाची लाईट रोज घालवायचा जेव्हा रंगेहाथ सापडला तेव्हा … !

113

एकदा प्रेमात पडले की आपल्या प्रेमासाठी माणुस काहीही करण्यास तयार होतो. ते करताना काही वेळेस आपल्या कृत्यामुळे आजबाजुच्यांना त्रास होत आहे याची देखील तमा राहत नाही. असाच काहीसा प्रकार बिहार मध्ये उघडकीस आला.

वीज, लाईट यांचे किती महत्व आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. थोड्यावेळासाठी जरी लाईट गेली तरी जीव अगदी कासावीस होतो. पण बिहारमधील एका प्रेमी युगलाने स्वताचे प्रेम साध्य करण्यासाठी अख्ख्या गावाला अंधारात ठेवले होते.
बिहारमधील पुर्निया जिल्ह्यातील गणेशपूर गावात गावकऱ्यांनी एका इलेक्ट्रीशियनला रंगेहाथ पकडलं. हा इलेक्ट्रेशिअन पठ्या त्याच्या त्याच गावातील प्रेयसीला सगळ्यांच्या न कळत भेटता यावे यासाठी संपुर्ण गावाचा वीजपुरवठा खंडीत करुन ठेवायचा.

हा प्रकारने त्याने बऱ्याचदा केला. गावातील लोकांना थोडाफार संशय येऊ लागल्यावर त्यांनी वीजपुवठ्या बाबत आजुबाजुच्या गावात चौकशी केली. तेव्हा हा प्रकार केवळ आपल्याच गावात होत आहे असे त्यांच्या ध्यानात आले. काही महिने सतत ठराविक काळासाठी संपुर्ण गावाचा वीजपुरवठा खंडीत व्हायचा . या प्रकरणी तपास घेण्याचे गावकऱ्यांनी ठरवले. व त्यांच्यासमोर एक भयानक सत्य आले. गावातील इलेक्ट्रीशियन त्याच्या प्रेयसीला भेटण्यासाठी स्वत: गावचा वीजपुरवठा खंडित करत असल्याचं गावकऱ्यांना समजलं.

गावकऱ्यांनी या विरोधात एक प्लॅन आखला व त्या इलेक्ट्रीशियन रंगे हात पकडले. त्यांनंतर गावतल्या लोकांनी त्याची मुंडन करुन गावातील रस्त्यांवरुन धींड काढली. त्याच्या प्रेमामुळे गावातले लोक कित्येक महिने वीजखंडितेला सामोरे जात होते. मात्र आपला राग व्यक्त करुन झाल्यानंतर गावकऱ्यांनी या इलेक्ट्रीशियनचं लग्न सरपंच आणि गावातील पंचांच्या उपस्थितीत त्याच्या प्रेयसीसोबत लावून दिलं.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !