भारतात आंतर जा ती य विवाह केल्यामुळे समाजातील काही लोक नाराज होऊन जातात अशातच लग्नाआधी मुलगा आणि मुलगी एकत्र लिव इन रिलेशनशिप मध्ये राहणे हे खूप मोठी गोष्ट ठरते. समाजातील लोक अश्या लोकांना टोमणे मारतात आणि त्रास देतात. खरंतर आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो कि, आता भारतात या नाते संबंधांना कायदेशीर मान्यता मिळाली आहे. काही जन याला विरोध सुद्धा करत आहेत तर काही जन याला चांगला निर्णय म्हणून याचे स्वागत सुद्धा करत आहे. चला तर जाणून घेऊया लिव इन रिलेशनशिप नेमके काय आहे?
लग्न हा खूप मोठा निर्णय असतो अशातच एकमेंकासोबत राहिल्याने समोरच्याची आवड, निवड आणि व्यवहार इत्यादीची माहिती मिळते. चला तर जाणून घेऊया लिव इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचे काय काय फायदे आहेत.
१) एकमेकांसोबत एकत्र काही दिवस लिव इन मध्ये राहिल्याने तुम्हाला कळते कि, तुमचा पार्टनर तुमच्या बाबत किती गंभीर आहे. कधी असं नको व्हयला कि तो फक्त तुमच्या सोबत टाइमपास करत होता किंवा या नात्याला घेऊन अजिबात गंभीर नाही होता. अशातच याचा अंदाज लिव इन ने लग्नाआधी लावता येतो.
२)काही जण लग्न फक्त शारीरिक संबंध निर्माण करण्याकरिता करत असतात मग लग्नांनातर काहींचा घटस्फोट होऊन जातो. म्हणून तुम्ही लिव इन मध्ये राहून हे स्पष्ट करू शकतात कि समोरचा व्यक्ती तुम्हाला खरं प्रेम करतो कि नाही. तो फक्त लग्न हे शारीरिक संबंध ठेवण्यासाठी तर करत नाही ना याची खात्री होते.
३) लिव इन मध्ये रहिल्याने तुमचे तुमच्या पार्टनर सोबत चांगले नाते निर्माण होत असतात मग लग्नांनातर एकमेकांसोबत एकत्र राहण्यास कोणताच अडथळा निर्माण होत नाही. तुम्हाला एकमेकांचा स्वभाव चांगल्या पद्धतीने माहित असतो. त्यामुळे लग्नांनातर भांडण होत नाही.
४)एक चांगल्या जीवनसाथीला एक चांगला रूम पार्टनर सुद्धा झाले पाहिजे. आपण कधीतरी आपल्या पार्टनरशी बाहेर काही काळाकरिता भेटत असतो तेव्हा सगळं काही ठीक वाटते परंतु जेव्हा तुम्ही एका छताखाली राहत असतो तेव्हा अनेक लहान मोठ्या गोष्टींमुळे एडजस्टमेंट होत नाही अशातच तुम्ही लिव इन मुळे पाहू शकता कि आपला पार्टनर एक चांगला रूममेट सुद्धा सिद्ध होतो कि नाही.
५)लग्न खूप मोठी जबाबदारी सुद्धा असते. लिव इन मध्ये सोबत राहिल्याने तुम्हाला जबाबदारीचे भान निर्माण होते. तुम्ही स्वतःला परखु शकता कि तुम्ही लग्नासाठी तयार आहात कि नाही.
६)मनुष्य काही काळ आपला स्वभाव बनावट ठेवू शकतो परंतु लिव इन मध्ये २४ तास एकत्र सोबत राहिल्याने आपल्याला आपल्या पार्टनरचा खरा स्वभाव कळू लागतो.