मनोरंजन इंडस्ट्रीमध्ये असे अनेक कपल आहेत ज्यांचे चित्रपट एकेकाळी खुप हिट झाले होते. पण वेळेसोबत या जोड्या ऑनस्क्रिन दिसणे बंद झाले कारण त्यांची जागा नवोदित कलाकरांनी घेतली. पण त्या कलाकरांवरील प्रेक्षकांचे प्रेम काही कमी झालेले नाही. त्यामुळे प्रेक्षकांच्या इच्छेखातर या जोड्या खुप वर्षांनी मोठ्या पडद्यावर पुन्हा पाहण्यास मिळाल्या. आता सध्या मोठ्या पडद्या सोबतच ओटीटीचा जमाना आहे. त्यामुळे चित्रपटांसोबतच या जोड्या वेबसिरीजमध्ये देखील पाहायला मिळतात. आज आम्ही तुम्हाला काही जोड्या दाखवणार आहोत ज्या ऑनस्क्रिन खुप हिट ठरलेल्या. ज्यांच्यात काळानुरुप काही बदल झाले.

१. अजय देवगण आणि तब्बु – अजय देवगन आणि तब्बू ने ‘विजयपथ’, ‘तक्षक’, ‘हक़ीक़त’, ‘गोलमाल अगेन’ आणि ‘दृश्यम’ सारख्या चित्रपटांत एकत्र काम केले होते. त्यानंतर खुप वर्षांनी ‘दे दे प्यार दे या चित्रपटात ही एकेकाळची सुपरहीट जोडी पुन्हा पाहण्यास मिळाली. या दोघांच्या अफेअरच्या चर्चा मध्यंतरी रंगल्या होत्या. तब्बुने अजयमुळे आजतायगत लग्न केले नाही असे म्हटले जात होते. पण एका मुलाखतीत तब्बुने स्पष्ट केले की अजय हा नेहमी एखाद्या भावाप्रमाणे माझ्यावर लक्ष ठेवुन असतो त्यामुळे माझी कधी कोणाच्या प्रेमात पडायची हिम्मत झाली नाही.

२. शाहरुख आणि काजोल – काजोल आणि शाहरुखची जोडी ही बॉलिवुडमधील आतापर्यंतची सर्वात सुपरहीट जोडी आहे. ‘बाज़ीगर’, ‘दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे’, ‘कुछ कुछ होता है’, ‘कभी अलविदा न कहना’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांसोबत इतर अनेक चित्रपटा्ंत दोघांनी एकत्र काम केले. दिलवाले चित्रपटात या दोघांना सर्वात शेवटी एकत्र ऑनस्क्रिन पाहिले गेले होते.

३. अनिल कपूर आणि माधुरी दिक्षित – अनिल कपूर आणि माधुरी दिक्षित या जोडीने ‘परिंदा’, ‘राम लखन’, ‘बेटा’ आणि ‘पुकार’ सारखे हिट चित्रपट इंडस्ट्रीला दिले . त्यानंतर खुप वर्षांनी ‘टोटल धमाल’ चित्रपटाद्वारे ही ऑनस्क्रिन हीट जोडी पुन्हा प्रेक्षकांना पाहण्यास मिळाली.

४. सैफ़ अली ख़ान आणि रानी मुखर्जी – सैफ़ अली ख़ान आणि रानी मुखर्जी या जोडीने फारश्या चित्रपटात एकत्र काम केले नाही. पण ‘हम तुम’, ‘थोड़ा प्यार थोड़ा मैजिक’ सारखे मोजके चित्रपट करुन ही ही जोडी मोठ्या पडद्यावर हिट ठरली. त्यानंतर बऱ्याच वर्षांनी बंटी और बबली २ या चित्रपटात या दोघांनी स्क्रिन शेअर केली.

५.अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनी – अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनी या जोडीने अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. त्यामध्ये नसीब’, ‘सत्ते पर सत्ता’ आणि ‘बागबान’ सारखे चित्रपट खुप हिट ठरले. त्यानंतर या दोघांनी बुढ्ढा होगा तेरा बाप या चित्रपटात एकत्र काम केले. पण त्या चित्रपटात दोघांचे एकत्र असे फारसे सीन नव्हते.

६. अजय देवगण आणि काजोल – अजय देवगण आणि काजोल ही जोडी ऑनस्क्रिनसोबतच ऑफस्क्रिनसुद्धा हिट आहे. ऑनस्क्रिन कपल साकारताना हे दोघे खऱ्या आयुष्यात प्रेमात पडले लग्न केले. या दोघांनी ‘इश्क़’, ‘प्यार तो होना ही था या चित्रपटांसोबत अन्य काही सिनेमांमध्ये देखील काम केले. त्यानंतर सर्वात शेवटी ‘तान्हा जी: द अनसंग वॉरियर’ या चित्रपटात त्यांना पाहिले गेले.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *