सध्या वेबसिरीजचा जमाना आहे. सिनेमागृहातील चित्रपटांप्रमाणेच ओटीटी वरील कटेंट देखील प्रेक्षकांना तितकाच आवडु लागला आहे. थिएटर मध्ये प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांपेक्षा ओटीटी वरील सिरीज या जास्त ओपनअप असणाऱ्या असतात कारण त्यांना सेन्सोरचे तितकेसे बंधन नसते. त्यामुळे या प्लॅटफॉर्मवर सहज नाजुक विषय हाताळले जातात.

नुकताच अभिजीत पानसरे यांच्या रानबाजार या वेबसिरीजचा ट्रेलर लॉन्च झाला. या सिरीजमध्ये अभिनेत्री तेजस्विनी पंडीत आणि प्राजक्ता माळी प्रमुख भुमिकेत आहेत. या सिरीजचा ट्रेलर पाहुन अनेकांच्या भुवया उंचावल्या. मराठीत पहिल्यांदाच इतका बोल्डनेस दाखवण्यात येणार असल्यामुळे अनेकजण या वेबसिरीजसाठी उत्सुक आहेत.

मराठी प्रेक्षकांची मानसिकताही बोल्ड सीन्सच्या बाबतीत अजुनही तितकीशी बदलली नाही. हा टीझर पाहुन अनेकांनी आमच्यावर टीका केल्या असे प्राजक्ता व तेजस्विनीने एका मुलाखतीत सांगितले. या मुलाखतीत त्यांनी प्रेक्षकांच्या मानसिकतेवर उलटे प्रश्न केले आहेत . तर काही प्रेक्षकांची उत्तरे देखील त्यांनी दिली. बोल्ड भुमिकांबद्ल तेजस्विनी म्हणाली की मी केलेल्या बोल्ड भुमिका लोकांना आवडतील की नाही याचा मी विचार करत नाही. कारण माझं सगळं काम आवडायला मी काय पैसा आहे.

या टीझरनंतर अनेकांनी दोघींना ट्रोल केले त्यावर सुद्धा तेजस्विनीने तिचे मत व्यक्त केले. ती म्हणाली की ट्रोलर्सना फार मनावर घेत नाही पण म्हणून कलाकार म्हणून व्यक्त होताना खूप विचारपूर्वक होते हे सांगायला तेजस्विनी विसरली नाही. तर प्राजक्तानं तर चक्क ट्रोलर्सच्या बाबतीत ‘मी निगरगट्ट होणार आहे’. असं थेट म्हटलं आहे. ती म्हणाली,’मी भारताची,महाराष्ट्राची नागरिक आहे. मी मला जे पटत नाही त्याविरोधात बोलणार. पण त्यावर जर कुणी काही भाष्य केलं तर मला फरक पडत नाही. पण आता त्याबाबतीत मी आणखी निगरगट्ट होणार असं बोलत प्राजक्तानं स्पष्टिकरण दिलं.

या मुलाखती दरम्यान त्यांनी रानबाझार या वेबसिरीजची वनलाईन स्टोरी सांगितली. तसेच टीझर पाहिल्यापासुन अनेकांच्या मनात या सिरीजबद्दल वेगवेगळ्या शंका निर्माण झाल्या होत्या त्यामुळे या सिरीजचा मुळ उद्देश देखील त्यांनी सांगितला. त्या म्हणाल्या की ‘जेव्हा राजकीय खेळी घडते तेव्हा एक सर्वसामान्य माणूस विवस्त्र होत असतो’…
सध्या ही वेबसिरीज कधी प्रदर्शित होते याबद्दल सगळे उत्सुक आहेत.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *