फक्त माणसचं दारू पित नाहीत, बघा ह्या कोंबड्याला लागते ४ दिवसाला एक क्वार्टर !

106

काहींच्या आयुष्यात दारु इतकी महत्वाची असते की ते तिच्याशिवाय राहूच शकत नाही. दारु प्यायल्या शिवाय त्यांना झोप लागत नाही. काहींचे हातपाय थरथरतात. अशी कित्येक उदाहरणे आपण ऐकली आहेत. पण भंडारा येथे एक वेगळीच घटना घडत आहे. तिथे एका कोंबड्याला दारुचे व्यसन लागले आहे. साधारण पणे कोंबडे दाणे टिपततात, किडेमकोडे खातात. पण हा कोंबडा भलताच शेफारला आहे.

भंडारा जिल्ह्याजवळील पिपरी गावातील भाऊ कोतारे या शेतकऱ्याने काही कोंबड्या पाळल्या आहेत. त्यांचा कुक्कुटपालनाचा व्यवसायच आहे. त्या कोंबड्यांमधील एक कोंबडा भलताच अवलीया आहे. त्या कोंबड्याला चक्क दारु पिण्याची सवय लागली आहे. त्या सवयीचे रुपांतर व्यसनात झाले आहे. माणसापेक्षा पण तो जास्त दारुच्या अधीन झाला आहे. त्याला दारुशिवाय अन्न-पाणी गोड लागत नाही.

तो ४ दिवसांमध्ये एक दारुची क्वार्टर संपवतो. त्याची ही सवय शेतऱ्याच्या भुईजड झाली आहे कारण त्याच्या दारुसाठी त्याला महिन्याला २ हजार रुपये खर्च करावे लागतात. खरेतर त्याला काही दिवसांपुर्वी मरी हा आजार झाला होता. त्यावर उपाय म्हणुन त्याला मोहाची दारु पाजण्याचा सल्ला एकाने दिला पण शेतकऱ्याला ती दारु मिळाली नाही म्हणुन त्याने त्या कोंबड्याला चक्क देशी दारु पाजली.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे देशी दारुनेही त्याचा आजार बरा झाला. पण त्याचे दुष्परिणाम म्हणजे त्या दारुचे कोंबड्याला व्यसनच जडले. त्याला ४ दिवसाला एक क्वार्टर लागते. आता तुम्ही म्हणाल की असा नसते चोचले असणारा कोंबडा बाळगायचा कशाला. पण तो त्या शेतकऱ्याच्या कुटुंबात सगळ्यांचा लाडका आहे. त्यामुळे ते त्याचे लाड मनापासून पुरवतात.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !