अखेर माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत यश आणि नेहाचा लग्न होणार, पहा फोटोज !

100

झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ या लोकप्रिय मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. या मालिकेतील यश नेहाची जोडी आणि परीचा निरागस अभिनय प्रेक्षकांच्या मनाला भावतो. नुकतंच प्रेक्षकांनी मालिकेत पाहिलं सगळे गैरसमज दूर झाल्यावर आजोबांनी यश आणि नेहाच्या लग्नाला परवानगी दिली आहे आणि आता मालिकेत प्रेक्षक यश नेहाचा लग्न सोहळा लवकरच पाहू शकतील.

यशवर्धन चौधरीच लग्न त्यामुळे या सोहळ्याचा थाट देखील तेवढाच मोठा असणार आहे आणि तितकेच कार्यक्रम देखील दिमाखदार असणार आहेत. या आठवड्यात प्रेक्षकांना यश आणि नेहाचा साखरपुडा, यशची बॅचलर पार्टी, मेहंदी, हळद, संगीत पाहायला मिळेल. या सगळ्या कार्यक्रमांमध्ये खूप रंजक वळणं देखील प्रेक्षकांना पाहायला मिळतील.

यश आणि नेहाच्या साखरपुड्यामध्ये यशाच्या हातात एक नाही तर चक्क २ अंगठ्या आहेत. यामध्ये काय ट्विस्ट आहे हे जाणून घेण्यासाठी बघत राहा माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वाजता फक्त आपल्या झी मराठीवर

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !