बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खान. शाहरुख खानचे चित्रपट पाहणं म्हणजे जणू एक पर्वणी असते. त्याचा अफलातून अभिनय, त्याची स्टाईल, पडद्यावरील वावर या सगळ्याच गोष्टी आपल्याला भुरळ पाडतात आणि त्याला रुपेरी पडद्यावर बघताना आपण भान हरपून पाहतच बसतो. अशातच गेला बराच काळ शाहरुख खानचे कोणतेही नवे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आलेले नाहीत. पण येत्या वर्षात शाहरुख खानच्या चित्रपटांची जणू पर्वणीच आप्ल्याला मिळणार आहे. शाहरुखच अनेक बिग बजेट चित्रपट आपल्या भेटीला येणार आहेत.

नुकताच शाहरुखच्या बहुचर्चित अशा ‘जवान’ या चित्रपटाचा फर्स्ट लुक प्रदर्शित झाला आहे. शाहरुख खानने त्याच्या ट्विटर अकाउंटवरून या चित्रपटाचा फर्स्ट लोकांचा व्हिडीओ शेयर केला आहे. या व्हिडिओमध्ये शाहरुख खानच्या नव्या चित्रपटातील लूकची झलक आहे. या व्हिडीओमधला शाहरुखचा डॅशिंग असा मॉन्स्टर फर्स्ट लूक पाहिल्यानंतर हा चित्रपट पाहण्याची प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

या व्हिडिओमध्ये शाहरुखच्या चेहऱ्यावर पट्टी बांधून तो मेट्रो स्टेशनच्या बाकावर बसलेला दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तो बंदूक चालवताना देखील दिसत आहे. या व्हिडिओमध्येच ‘जवान’ चित्रपटाची रिलीज डेट देखील जाहीर करण्यात आली आहे. शाहरुखचा जवान हा डॅशिंग चित्रपट २ जून २०२३ ला चित्रपटगृही प्रदर्शित होणार आहे.

रेड चिलीज या शाहरुख खानच्या प्रोडक्शन हाऊसने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट हिंदी भाषेसोबतच तामिळ, तेलगू, मल्ल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. हा सिनेमा एकप्रकारे पॅन इंडिया सिनेमा असणार आहे. तामिळ चित्रपटसृष्टीतील ‘मरसल’, ‘कथी’, ‘बिगील’ या सारख्या प्रसिद्ध झालेल्या तामिळ चित्रपटांचे दिग्दर्शक ऍटली यांनी ‘जवान’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

‘जवान’ या चित्रपटासोबतच शाहरुखचे ‘पठाण’ आणि ‘डंकी’ हे देखील आगामी चित्रपट पुढील वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. ‘पठाण’ हा येत्या वर्षात जानेवारी मध्ये प्रदर्शित होणार आहे तर ‘डंकी’ हा चित्रपट डिसेंबर २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहेत. आपल्या चाहत्या शाहरुख खानला तब्बल तीन वर्षांनंतर रुपेरी पडदयावर पाहण्याची प्रेक्षकांना फार आतुरता झाली आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *