आपल्या नृत्य प्रतिभेच्या जोरावर बॉलिवूड इंडस्ट्रीला थिरकायला लावणाऱ्या जेष्ठ नृत्य दिग्दर्शिका सरोज खान यांचं वयाच्या ७२व्या वर्षी मुंबई येथे गुरुनानक हॉस्पिटलमध्ये पहाटे १:५२ ला निधन झाले. मधुमेह, हृ दयविकार इत्यादी आजाराने त्या त्रस्त होत्या. २० जून पासून श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यांच्यावर उपचार सुरु होते. सरोज खान यांनी २००० पेक्षा जास्त गाण्यांचे नृत्य दिग्दर्शन केले आहे. त्यांना त्यांच्या हिंदी चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल तीन वेळा राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले. माधुरी दिक्षित, जुही चावला, श्रीदेवी यांसारख्या अभिनेत्रींनी त्यांच्यासोबत काम केले. त्यापैकी माधुरी दीक्षित व सरोज खानच्या जोडीला चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. जिवनाच्या शेवटच्या श्वासापर्येंत त्या अविरत काम करत होत्या. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित “क लं क ” चित्रपटातील “त बा ह हो गये ” हे त्यांच अखेरचे गाणे ठरले . करिअरच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत अनेक गाण्यामध्ये बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम केलं.

त्यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीमध्ये खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे. संपूर्ण बॉलिवूड जगतात शोककळा पसरली आहे. अनेक बॉलिवूड कलाकाराने ट्विट करून आपल्या दुःखद भावना कळवल्या आहेत आणि त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. बॉलिवूड इंडस्ट्री त्यांचे हे योगदान कधीच विसरणार नाही. प्रत्येक कलाकारांच्या, चाहत्यांच्या, प्रेक्षकांच्या मनात त्या जिवंत राहतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *