तानाजी फिल्मचे डायरेक्टर ओम राउत सोबत ऋतिक रोशन करणार सिनेमांत काम ?

313

आपल्या अभिनयाने आणि नृत्य प्रतिभेने प्रेक्षकांच्या मनात घर करणारा अभिनेता ऋतिक रोशन साठी 2019 हे वर्ष त्याच्या फिल्मच्या बाबतीत चांगल ठरल. या वर्षात ऋतिक ने एक मागोमाग एक दोन हिट सिनेमे दिले .सुपर 30 आणि वॉर या दोन्ही चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. आता पुढे ऋतिक काय करणार याची उत्सुकता चाहत्यांना लागून राहिली होती. आता त्याच्या नवीन प्रोजेक्ट बद्दल चर्चा सुरु झाली आहे.

ओम राउत सोबत काम करेल ऋतिक!!

ऋतिकचा क्रिश ४ हा सिनेमा हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होईल अस म्हणलं जात होती, मधेच चर्चा होती कि ऋतिक “सत्ते पे सत्ता” या सिनेमाच्या रीमेक मध्ये काम करेल. परंतु स्क्रिप्ट इश्यू मुळे या सिनेमाच्या बाबतीत अंतिम निर्णय झालेला नाही . सूत्रांच्या रिपोर्टनुसार चर्चा सुरु आहे कि ऋतिक फिल्म “तानाजी: द अनसंग वॉरियर” चे दिग्दर्शक राउत सोबत काम करू शकतो. सूत्रांनुसार ओम राऊत व्यतिरिक्त इतर दिग्दर्शकासोबतही ऋतिक ची चर्चा सुरु होती.


या पूर्वी ऋतिक ने वॉर या एक्शन मूवी मध्ये मुख्य भूमिका केली आहे. त्याच्यासोबत टाइगर श्रॉफ देखील मुख्य भूमिकेत दिसला. ऋतिक च्या दमदार अभिनयाला चाहत्यांकडून भरभरून प्रतिसाद आणि प्रेम मिळाल. कमाईच्या बाबतीत फिल्म बॉक्स ऑफिस वर सुपरहिट राहिली. आता ऋतिकच्या पुढील प्रोजेक्टबद्दल चाहत्यांच्या मनात उत्सुकता आहे.