चित्रपटातील सासरे म्हटले की आपसूकच प्रसिद्ध अभिनेते आलोक नाथ यांचा चेहरा डोळ्यांसमोर येतो. चित्रपटातील त्यांच्या पात्रांमुळे त्यांना संस्कारी सासरे असे नाव पडले होते. पण आलोकनाथ यांनी अभिनय क्षेत्रात जरी भरपूर नाव कमावले असले तरी वैयक्तिक आयुष्यात मात्र ते वादात सापडले होते.

अभिनेते आलोक नाथ यांनी अनेक चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारल्या मात्र त्यांना जास्त पसंती मिळाली ती वडिल आणि सासऱ्यांच्या भूमिकेत. आलोक नाथ यांनी अनेक सेलिब्रेटींच्या वडिलांची भूमिका साकारली आहे. एवढेच नाही तर त्यांनी वयाच्या ३४ व्या वर्षी ‘अग्निपथ’ चित्रपटात ४८ वर्षीय अमिताभ बच्चन यांच्या वडिलांची भूमिका साकारली होती.

खरेतर ते अमिताभ यांच्यापेक्षा ही लहान आहेत पण पडद्यावर त्यांनी त्यांच्या वडिलांची भूमिका केली होती. या सुसंस्कृत बाबूजींचे जीवन खऱ्या आयुष्यात मात्र वादांनी भरलेले आहे. त्यांच्यावर अनेक गंभीर आरोपही करण्यात आले आहेत.

80 च्या दशकात नीना गुप्ता आणि आलोक नाथ यांच्या अफेअरच्या बातम्या वाऱ्यासारख्या वाहत होत्या. दोघे अनेकदा एकत्र दिसायचे. त्यावेळी टीव्ही मालिका ‘बुनियाद’मध्ये नीनाने आलोकच्या सुनेची भूमिका साकारली होती. यादरम्यानच दोघांमधील जवळीक वाढली होती. मात्र, त्यांचे नाते फार काळ टिकले नाही.


मी टू या प्रकरणात आलोक नाथ यांचेही नाव आले होते. 2018 मध्ये इंडस्ट्रीतील अनेक महिलांनी त्याच्यावर वि’न’य’भं’ग आणि जबरदस्ती केल्याचा आरोप केला होता. आलोक नाथ यांनी दारूच्या नशेत ब’ला’त्का’र केल्याचा आरोप निर्मात्या विनिता नंदा यांनी फेसबुक पोस्टद्वारे केला होता.

त्यानंतर काही दिवसांनी अभिनेत्री दीपिका अमीननेही त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. त्यावर रेणुका शहाणे यांनी दीपिकाला पाठिंबा दिला. रेणूका शहाणेने हम आपके है कौनमध्ये आलोकनाथच्या सुनेची भूमिका साकारली होती.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *