कुत्रा हा सर्वात इमानदार प्राणी म्हणून ओळखला जातो. तसेच तो माणसाचा चांगला आणि विश्वासू मित्र असतो. कुत्र्याचं आणि माणसाचं नातं खूप भावनिक मानलं जातं. माणसाचा जीव धोक्यात आला की त्याला वाचवण्यासाठी कुत्रा कधीही स्वत:च्या जीवाशी खेळून माणसाचे प्राण वाचवण्याचे प्रयत्न करतो.

माणसांच्या आणि कुत्र्याच्या मैत्रीची अनेक उदाहरणे आपण ऐकली आणि पाहिली आहेत. पण हेच चांगले प्रेमळ कुत्रे काही वेळेस खतरनाकसुद्धा असू शकतात. कुत्र्यांच्या अनेक प्रजाती आहेत ज्या अतिशय धोकादायक आहेत. त्यामुळे त्यांच्यापासून दूर राहणे आपल्या हिताचे असते. आज आम्ही तुम्हाला जगातील अशा 5 कुत्र्यांच्या प्रजातींबद्दल सांगणार आहोत ज्या अतिशय धोकादायक आहेत.

रोट्टवीलर्सः ही कुत्र्यांची प्रजात जगातील काही प्रसिद्ध प्रजातींपैकी एक आहे. हे अधिकतर जर्मनीत आढळतात. हे कुत्रे खूप शक्तिशाली आहेत,तसेच त्यांचे जबडे खूप मजबूत आहेत. या जातीच्या कुत्र्यांना अनोळखी माणसे आणि इतर वेगळे कुत्रे आसपास असलेले आवडत नाही. जर त्यांच्या मालकावर कोणी रागावले तर ते खूपच भयानक रुप धारण करतात. या कुत्र्यांना लगेच राग येतो.


पिट बुल – या जातीचे कुत्रे सुद्धा धोकादायक कुत्र्यांच्या प्रजातींपैकी एक आहे. पण ते एवढेही खतरनाक नसतात. उगीचच ते कोणावरही हल्ला करत नाही. पण यांचे मालक त्यांनी नीट काळजी घेत नसतील तर त्यांचा राग वाढत जातो. त्यांना जर नीट पाळले तर ते खूप छान शांत आणि विनम्र, मैत्रीपूर्ण राहतात.

चौ-चौ – या जातीचे कुत्रे दिसायला खूप गोड आणि शांत असले तरी ते तितकेच भयानकसुद्धा असतात. ही जात चीनमध्ये आढळते. या कुत्र्याच्या मर्जीशिवाय त्याच्या आसपासही कोणी जाऊ शकत नाही. सगळ्यात आक्रमक कुत्र्यांपैकी एक म्हणून याला ओळखले जाते.

जर्मन शेफर्ड – या जातीचे कुत्रे कोणाला माहित नाही असे होणारच नाही. ते वजनाने हलके असतात पण खूप निडर असतात. त्यांच्या शरीराची हालचाल होत राहणे आवश्यक असते त्यामुळे ते आक्रमक होत नाही. त्यांना राग आल्यावर ते कोणाचेच ऐकत नाही.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *