महेश भट्ट आणि आलीय भट्ट यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल, जाणून घ्या काय आहे कारण …..

472

आलीया भट्ट हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री आहे. “स्टुडन्ट ऑफ द इयर” या करण जोहर दिग्दर्शित चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यांनंतर “बद्री की दुल्हनिय, राझी, कलंक, गल्लीबॉय” या चित्रपटात तिने प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.”गल्लीबॉय” या चित्रपटातील भूमिकेबद्दल तिला अवॉर्डही देण्यात आला आणि तो सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट सुद्धा राहिला.तिने आपल्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मनेदेखील जिंकली. आज तिचा मोठा चाहता वर्ग आहे. तसेच रणबीर कपूर सोबतच्या अफेअर मुळे ती मागील काही दिवस चर्चेत होती.

आता मात्र ती चर्चेत असण्याचे कारण वेगळे आहे. आलीया भट्ट चा आगामी चित्रपट “सडक २” प्रदर्शित होण्यापूर्वीच वादात सापडला आहे.”सडक २” या चित्रपटात आलीया भट्टची बहीण पूजा भट्ट, आदित्य रॉय कपूर, संजय दत्त हे मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.

सुशांतच्या आत्महत्येनंतर घराणेशाहीच्या मुद्द्यावरून या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी प्रेक्षकांकडून सातत्याने केली जात होती. त्यातच चित्रपटाच्या पोस्टर वरून नवीन वाद उभा राहिला आहे. कैलास मानसरोवर हा पर्वत हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र मानला जातो, चित्रपटाच्या पोस्टर मध्ये कैलास मानसरोवर या पर्वतावर “सडक २” असं छापले गेले आहे, त्यामुळे अनेक हिंदू धर्मियांच्या भावनांना ठेच पोहिचली आहे, त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे या चित्रपटाचे दिग्दर्शक महेश भट्ट व अभिनेत्री आलीया भट्ट यांच्या विरोधात धार्मिक भावना दुखावल्याच्या कारणावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या विरुद्ध दाखल केलेल्या गुन्ह्याची सुनावणी ८ जुलै ला होणार आहे.