बॉलिवूड अभिनेत्री आणि टीव्ही सेलिब्रिटी मलायका अरोरा हे नावं काही आपल्यासाठी नवीन नाही. ती नेहमीच तिच्या बोल्डनेसमुळे चर्चेत असते. असाच मनमोहक आणि हॉट अवतार तिने पुन्हा दाखवला आहे, त्यामुळे तिचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

व्हिडिओमध्ये मलायका डीप नेकच्या बोल्ड ड्रेसमध्ये दिसत आहे. तिच्या या आउटफिटवर तिने तिचं लोकप्रिय आयटम साँग ‘मुन्नी बदनाम हुई…’ वर देखील नृत्य केले. मलायका अरोरा अलीकडेच जॉर्जियातील बटुमी येथे एका कॅसिनो लॉन्चसाठी गेली होती. या कार्यक्रमासाठी तिने स्ट्रॅपलेस गाऊन परिधान केला होता.

सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या मलायका अरोराचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पाहायला मिळत आहे. व्हायरल होत असलेल्या क्लिपमध्ये अभिनेत्री तिच्याच हिट ‘मुन्नी बदनाम हुई’ गाण्यावर डान्स करताना दिसली. मलायकाचा हा हॉट अवतार पाहून तिचे चाहतेही भारावून गेले आणि त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कौतुकाचे पूल बांधायला सुरुवात केली.

चाहत्यांनी मलायकाचे कौतुक केले आणि तिला सुंदर, हॉट आणि गोर्जियस म्हटले. मलायका तिच्या स्टायलिश लुक्स आणि फॅशन चॉईससाठी ओळखली जाते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Otium Casino Batumi (@otiumcasino)


तिने तिच्या एका मुलाखतीत सांगितले होते की ती आता तिच्या फॅशनवर पूर्वीपेक्षा जास्त प्रयोग करते. अलीकडेच, मलायका अरोरा तिच्या ड्रेसिंग सेन्सबद्दल आणि लोकांच्या कमेंट्सबद्दल बोलताना म्हणाली, ‘स्त्रीला नेहमी तिच्या स्कर्टच्या लांबीवरून किंवा तिच्या नेकलाइनच्या डिपनेसवर ठरवले जाते…

जे लोक माझ्या नेकलाईनबद्दल बोलतात त्यांच्यानुसार मी माझे आयुष्य जगू शकत नाही. ड्रेसिंग ही अतिशय वैयक्तिक निवड आहे. तुमची विचारसरणी कशीही असू शकते, पण माझ्यासाठी ती तशी नाही. माझी निवड माझी स्वतःची असावी.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *